Devendra Fadnavis Statement on Nasarapur Case : नसरापूर प्रकरणातील नराधमास मृत्युदंडाची शिक्षा देणार - देवेंद्र फडणवीस
03-May-2026
Total Views |
मुंबई : (Devendra Fadnavis Statement on Nasarapur Case) "मी शनिवार दि. २ रोजी स्वतः पीडितच्या वडिलांशी दोन वेळा बोललो आहे. आपल्याला त्या नराधमास मृत्युदंडाची शिक्षा द्यावयाची आहे असे मी त्यांना समजावले आहे. त्याकरिता वेळेत चार्जशीट दाखल होणे.आणि केस चालणे याकरिता आम्ही उच्च न्यायालयाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्टट्रॅकवर नेतो आहोत.
रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकशाहीत आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकात फाशी दिली पाहिजे पण लोकशाहीत ते करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते." अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार दि.३ रोजी नागपूर येथे दिली.
"कुणालाही कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये यासाठी कोणतीही पळवाट न ठेवता या नराधमाला यमसदनी कसे पाठवायचे,मृत्यूदंड कसा होईल असा संपूर्ण प्रयत्न राज्य शासनाच्या वतीने केला जाईल. न्यायालयातून हे प्रकरण वेगाने मार्गी लावले जाईल. तशा संदर्भातील एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिले आहे.घटना गंभीर आहे त्यामुळे नागरिकांचा रोष असणं चुकीचे नाही आहे.
पण काही लोक याही परिस्थितीचा फायदा घेऊन वेगळ वळण लावण्याचा प्रयत्न करत होते.पण मी मुलीच्या वडिलांनी परिस्थिती समजून घेतली आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आम्ही आभारी आहोत. या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ताकतीने उभे आहोत. नराधमाचे जुने गुन्हे काय आहेत हे देखील शोधून काढले जातील. या गुन्ह्यातून मात्र तो बाहेर येऊ शकत नाही."असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis Statement on Nasarapur Case)