तृणमूल काँग्रेस जरी २०२१ला जिंकली असली, तरी ममता बॅनर्जीना नंदीग्राम येथे पराभव पत्करावा लागला होता. २०२१च्या निवडणुकीत जनतेचा संदेश स्पष्ट होता; अन्याय, अत्याचार करणारी दुराचारी दीदी नको. त्यामुळे मागील दारातून आलेल्या दीदींनी यावेळेस मतदारांना त्यातही हिंदूंना नरक यातना काय असतात, याचा अनुभव देण्याचा निश्चय केला.
जगप्रसिद्ध वाक्य आपल्या सर्वांना माहीत आहे, सत्ता भ्रष्ट करू शकते आणि निरंकुश सत्ता पूर्ण भ्रष्ट करतेच. २०२१ ते २०२६ ममतादीदींनी कोणत्या ही पद्धतीने लोकशाही मार्गाने राज्य केलेच नाही, तर आपल्या पराभवाचा बदला म्हणून त्यांनी जनतेवर, त्यातही हिंदूंवर अतोनात अत्याचार केले. त्यांच्या हालाला कोणताही पारावर राहिला नाही. कोणीच वाली राहिला नाही.
२०२१ नंतर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील एका पोट निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जीना जबरदस्त धक्का बसला. मुस्लीमबहुल जिल्ह्यांमध्ये सर्वच्या सर्व जागा २०१७ पासून त्यांच्याकडे असताना या निवडणुकीत ती जागा टीएमसीच्या हातातून काँग्रेसकडे गेली. मुस्लीमबहुल क्षेत्रात मत विभाजित होऊ शकते, ही धोक्याची घंटी समजून त्यांनी त्यांना पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी अधिक प्रयत्न सुरू केले. २०१७ नंतर सर्व प्रकारच्या अनैतिक बळाचा आणि युक्त्यांचा वापर करत त्यांनी घुसखोरांची संख्या ही मुस्लिम बहुल क्षेत्रासोबत हिंदू आणि पहाडी जिल्ह्यांमध्येही ज्यात दार्जिलिंग कॉलिंगपोंग सारख्या ठिकाणीही जबरदस्तीने वसवण्यास सुरुवात केली.
२०२१ मध्ये परिवर्तन होणार या विश्वासानेच लोकांनी मतदान केलेलं होतं त्यात ममता बॅनर्जीच्या अशा सर्व वागण्याने हळूहळू त्यांच्या विरोधामध्ये एक वातावरण निर्माण होऊ लागले. मूळ मुसलमानांनाही बांगलादेशी घुसखोर हे प्रकरण जड जाऊ लागले. त्यातच असंविधानिक पद्धतीने ओबीसी सूचित ७५ मुस्लिम जातींचा समावेश केला जे घुसखोर होते. ज्याच्या आधाराने मुस्लिम घुसखोर हे सरकारी यंत्रणेमध्ये स्थिरावले. ह्या कारणाने सर्वच समाज हा ममतादीदींच्या विरोधामध्ये हळूहळू एकजूट होऊ लागला. तो २०२६ निवडणुकींपेक्षाही राष्ट्रपती राजवटीसाठी वाट बघू लागला.
यातूनच सरकार जरी तृणमूल काँग्रेसचे असले तरी विषारी जिहादी सावट पूर्णपणे पश्चिम बंगालवर पसरली होती. यातून व्यक्तिगत महिला अत्याचारासोबतच २०२३ मध्ये संदेश खाली येथे महिला व हिंदू समाजाच्या अमानवीय अत्याचाराची करूण कहानी सर्वांच्या समोर पश्चिम बंगालमधील महिला असुरक्षिततेचे दाहक स्वरूप घेऊन समोर आले. अनैतिक आणि पशुतुल्य व्यवहार करणाऱ्या शहाजानच्या विरोधामध्ये पीडितांनी मोर्चा काढला. हे आंदोलन आगामी परिवर्तनाची ठिणगी ठरली. अशा अनेक घटना या राजरोस होऊ लागल्या. आरजे कार वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीची झालेली बलात्कार सहित झालेली हत्या आणि त्याला सरकारने एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने दिलेले नाटकिय वळण ह्याचा परिपाक होऊन लोकांच्या मनात सरकारच्या विरोधामध्ये भावना अत्यंत प्रबळ झाल्या. ज्या ग्रामीण भागामध्ये ममतादीदीं, टीएमसीचे वर्चस्व होतं त्या टीएमटीच्या घरांमधील महिलांनी सनातन आणि राष्ट्रीय वाट धरायला सुरुवात केली. लक्ष्मी भंडार हे वरवर महिलांना खुखवणारी योजना असली तरी त्याचा लाभ प्रत्यक्ष गरजू महिलांना मिळतच नव्हता.
अभी नहीं तो कभी नहीं ह्याचा ध्यास घेत भारतीय जनता पार्टीने ही अंतिम लढाई समजून निवडणुकीची जय्यत तयारी केली आणि २०२६ ला पाहता पाहता ममतादीदी आणि टीएमसी चे मयूर, अनैतिक, अत्याचारी, दुराचारी, जिहादी मानसिकतेचे सरकार पाडून हिंदू हिताचा विचार करणारे सरकार स्थापन केले.
- शरद जयश्री कमलाकर चव्हाण
8422882614