उलवेतील अवैध अतिक्रमण जमीनदोस्त; सिडको प्रशासनाची धडक कारवाई

    28-May-2026   
Total Views |
 
Ulwe Illegal Mosque Demolition
 
मुंबई : (Ulwe Illegal Mosque Demolition) उलवे येथील सेक्टर १९, प्लॉट नं. ९४अ वर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अवैध मशिदीवर अखेर बुधवारी रात्री प्रशासनाने धडक कारवाई करत संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त केले. उच्च न्यायालयाने अतिक्रमणधारकांची याचिका फेटाळल्यानंतर, कायदेशीर पळवाटा शोधण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असतानाच सिडको प्रशासनाने तत्परता दाखवून ही मोठी कारवाई केली आहे.(Ulwe Illegal Mosque Demolition)
 
सदर प्लॉटवरील अवैध बांधकामासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर २२ मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने अतिक्रमणधारकांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर सिडको प्रशासनाने संबंधितांना अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस बजावली होती, ज्या नोटीसची मुदत बुधवारी रात्री संपत होती.(Ulwe Illegal Mosque Demolition)
 
मिळालेल्या माहितीनुसार, अतिक्रमणधारक पनवेल दिवाणी न्यायालयात धाव घेऊन या कारवाईला स्थगिती मिळवण्याच्या जोरदार तयारीत होते. मात्र, कोणताही न्यायालयीन स्थगिती आदेश येण्यापूर्वीच प्रशासनाने वेगवान हालचाली केल्या. स्थानिक जागरूक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे गुरुवारी पहाटे सकाळीच सिडकोचे पथक मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. नोटीसची मुदत संपताच प्रशासनाने अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवून ते निष्कासित केले.(Ulwe Illegal Mosque Demolition)
 
सत्याचा विजय आणि अन्यायाचा पराभव
 
या अवैध अतिक्रमणाविरोधात स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रदीर्घ आणि अहोरात्र संघर्ष केला होता. त्यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा, प्रशासनाला दिलेली वेळेची जाणीव आणि दाखवलेली एकजूट यामुळेच ही ऐतिहासिक कारवाई यशस्वी होऊ शकली. प्रशासनाचा बुलडोझर चालून कारवाई यशस्वी होताच उपस्थित नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा देत परिसरात प्रचंड आनंदोत्सव साजरा केला. हा सत्याचा विजय आणि अन्यायाचा पराभव आहे, अशी भावना यावेळी लढ्यात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.(Ulwe Illegal Mosque Demolition)
 
भूमाफियांना कडक इशारा
 
सिडको प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे उलवे परिसरातील भूमाफियांना आणि अवैध बांधकाम करणाऱ्यांना एक प्रकारे मोठा इशारा मिळाला आहे. सरकारी भूखंडांवर होणारी अतिक्रमणे खपवून घेतली जाणार नाहीत, हा संदेश या कारवाईतून स्पष्ट झाला असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.(Ulwe Illegal Mosque Demolition)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक