मुंबई : (Suvarnadurg Fort Attack Case) दापोलीच्या हर्णे येथे दोन हिंदू युवकांना धर्मांध मुस्लिमांच्या जमावाने मारहाण केल्याने परिसरात बुधवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्वप्नील गुरव व रघुवीर या दोन हिंदू युवांना ४० ते ५० जणांनी घेरून अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. छत्रपती शिवरायांच्या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर धूम्रपान व मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना हटकले म्हणून स्वप्नील व रघुवीर यांच्यावर धर्मांधांनी हल्ला केल्याचे निदर्शनास आले.(Suvarnadurg Fort Attack Case)
मिळालेल्या माहितीनुसार, हर्णे येथील किल्ला परिसरात धर्मांध मुस्लिम युवक धूम्रपान व मद्यपान करत असल्याने त्यांनी हिंदू युवकांनी हटकले. या गोष्टीचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी धर्मांधांनी जमावाने येत स्वप्नील व रघुवीर यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले असून एकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.(Suvarnadurg Fort Attack Case)
घटनेची माहिती मिळताच दापोली परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमले. त्यांनी मारहाण करणाऱ्या धर्मांध टोळक्यांविरोधात तात्काळ अटक करून कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे कुणीही अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये याबाबत त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.(Suvarnadurg Fort Attack Case)
सुवर्णदुर्ग किल्ल्यावर दररोज अनेक शिवप्रेमी आणि तरुण लाठीकाठीचे प्रशिक्षण घेण्यासाठी तसेच गडाच्या साफसफाईसाठी नित्यनियमाने जात असतात. दुर्दैवाने, गेल्या काही दिवसांपासून काही समाजकंटक याठिकाणी नशापानासारखे गैरप्रकार करत आहेत. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा हा गैरप्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा सूड म्हणून दुसऱ्यादिवशी कार्यकर्त्यांवर अत्यंत जीवघेणा आणि पूर्वनियोजित हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्यांची संख्या ३० ते ५० च्या आसपास होती. त्यामुळे यात सामील असलेल्या सर्व धर्मांधांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.(Suvarnadurg Fort Attack Case)
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असून त्यांच्या पवित्र गडकिल्ल्यांवर चालणारे गैरप्रकार रोखणे हे प्रत्येक शिवप्रेमींचे कर्तव्यच आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्यावर नशापान करणाऱ्या समाजकंटकांना रोखले म्हणून शिवप्रेमी कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला जाणे, ही अत्यंत निंदनीय आणि संतापजनक घटना आहे. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी.(Suvarnadurg Fort Attack Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक