पाण्याला विरोध आणि दारु विकायला परवानगी हे मविआचे धोरण होते - नवनाथ बन
28-May-2026
Total Views |
मुंबई : (Navnath Ban Statement) "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पाणि पिण्याच आवाहन केल्यानंतर संजय राऊत यांना झिंग चढली आहे.मविआचे सरकार असताना त्यांनी पाण्यासाठी विरोध केला होता.आणि दुकानात वाईन विक्री सुरू केली होती.पाण्याला विरोध करायचा आणि दारु विकायला परवानगी द्यायची हे मविआचे धोरण होते.तुमच धोरण वाईन प्या अस होत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच धोरण पाणि प्या अस आहे."असा घणाघात भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरूवार दि.२८ रोजी केला. उबाठा खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते बोलत होते.(Navnath Ban Statement)
"भारताकडे पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे.काही लोक जाणिवपूर्वक डिझेल पेट्रोलचा साठा करत आहेत.काही जिल्ह्यात दरवेळेपेक्षा ७५ टक्के मागणी वाढलेली आहे.कारण काहीजण साठेबाजी करून काळाबाजार करण्याचा प्रयत्न करत आहेत.चीनमध्ये २५ टक्के तर आपल्याकडे फक्त ५ टक्के इंधनवाढ झाली आहे.युध्दाची परीस्थिती नियंत्रणात आल्यानंतर हे दर कमी केले जातील." असेही बन यांनी स्पष्ट केले.(Navnath Ban Statement)
"तुफान कॉंग्रेसमध्ये,मविआमध्ये आले आहे.आसाम,पश्चिम बंगाल मध्ये आलेल्या तुफानात जशी कॉंग्रेस भूईसपाट झाली,राज्यात मविआ भूईसपाट झाली,आपला पक्ष शिल्लक सेना राहिला आहे.त्याकडे राऊत यांनी बघाव.आर्थिक तुफान सांभाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत."असा टोला बन यांनी राऊत यांना लगावला.(Navnath Ban Statement)
"नीटपेपरफुटी प्रकरणात सरकारने स्वतःहून कारवाई केली.ज्यावेळेस यातून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे हे समजले तेव्हा सरकारने कुणाचीही गय केली नाही.उध्दव ठाकरेंसारखे मौनीबाबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत.या प्रकरणात राऊत यांनी कॉंग्रेसला जाब का विचारला नाही." असा प्रश्न बन यांनी राऊत यांना विचारला.(Navnath Ban Statement)