वराह रूपम दैव वरिष्ठम...

    28-May-2026
Total Views |
 
Mira Road Bakrid Controversy
 
‘ठकासी असावे ठक|’ ही समर्थांची उक्ती मोठ्या धारिष्ट्याने ‘बकरी ईद’च्या निमित्ताने हिंदूंनी जगून दाखवली. सोसायटीमध्ये पशुबळी देण्याचे प्रकार प्रशासनाला सोबत घेऊन रोखण्यापासून ते वराह महाराजांना प्रसन्न करून घेऊन, आपल्या वस्त्या सुरक्षित ठेवण्याचा शहाणपणा हिंदूंनी दाखवला आहे. या नव्या बदलाचे स्वागत तर केलेच पाहिजे. पण, कायद्याचे पालन करण्यासाठी पुढे आलेल्या प्रशासनाचेही अभिनंदन केले पाहिजे.
 
वराह रूपम दैव वरिष्ठम...’ असे लोकपरंपरा व त्याचे महत्त्व सांगणार्‍या ‘कांतारा’ या सिनेमाचे नांदीचे गाजलेले गीत आहे. उत्तम वाद्यमेळ, सुसूत्र रचना आणि अंगावर शहारे आणणारी ‘सिनेमॅटोग्राफी’ हे ‘कांतारा’चे वैशिष्ट्य. रूढ सिनेमाच्या चौकटी मोडल्या की, यशस्वी सिनेमा करता येऊ शकतो, असा संदेश या सिनेमाने व त्याच्या नायकाने सिनेजगताला दिला. यंदाच्या ‘बकरी ईद’लासुद्धा मुंबईनजीकच्या मिरा रोड येथे रूढ झालेली एखादी बेकायदेशीर परंपरा मोडायची ठरवली की, ती कशी मोडता येते, हे हिंदूंनी दाखवून दिले. पालिकेत, राज्यात व केंद्रात कोणत्या विचारांचा दबदबा आहे, यावर प्रशासन कसे काम करायचे; ते निश्चित करीत असते. नरेंद्र मोदींची ‘तपपूर्ती’ ही हिंदूंच्या मान-सन्मानाचा, भावनांचा सन्मान करणार्‍या संघराज्याची ‘तपपूर्ती’ आहे. यामुळेच मिरा रोडला जे झाले, त्यात महानगरपालिकेनेसुद्धा महत्त्वाची भूमिका निभावली.
 
‘बकरी ईद’ला गोवंश, बकर्‍या, मेंढ्या, उंट, रेडे, एडके, मिथुन अशा कितीतरी निष्पाप चतुष्पाद प्राण्यांचे बळी दिले जातात. मुसलमानांच्या या परंपरेला सात्विकतेपेक्षा हिंसेचा व मस्तवालपणाचाच दुर्गंध आहे. मनाने, शरीराने आपण उच्चभ्रू वस्त्यांमध्ये, टोलेजंग इमारतींमध्ये राहायला आलो; तरी आपली मानसिकता बुरसटलेली, मध्ययुगीन कशी असू शकते, याचा प्रत्यय धर्मांध मुसलमान देत असतात. वस्तुत: सहकारी सोसाट्यांमध्ये पशुबळी देणे हे बेकायदेशीरच आहे. याचा संबंध धर्माशी नसून, त्या वसाहतींमध्ये राहणार्‍या मंडळींच्या आरोग्याशी आहे. हा कायदा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू असून, त्याचा उद्देश ‘नागरीसंहिता’ इतकाच आहे. पशुबळी दिल्यानंतर होणारा रक्तपात, त्या ठिकाणी स्वच्छता नीट झाली नाही, तर उद्भवणारे मानवी जीवनासमोरचे रोगराईचे प्रश्न गंभीर आहेत. मात्र, इथे स्पर्धा पैशाची, मग्रुरीची व हिंदूंना खिजवण्याची असते. या सगळ्यांत आणखीन एक मजेशीर बाब म्हणजे, दिया मिर्झाछाप पर्यावरणवादी, ‘पेटा’छाप प्राणिप्रेमी या सगळ्या बाबतीत कुठल्या तरी बिळात जाऊन लपलेले असतात. कुठलेही प्रश्न मुस्लिमांशी संबंधित असले की, ही मंडळी चिडीचूप असतात.
 
महाराष्ट्रासारख्या राज्यात गोवंश कापण्याची एकेकाळी स्पर्धा लागत असे. बोकडांचे बळी देत असतानासुद्धा आपण किती महागातला बोकड विकत घेऊन बळी देतो, यावर बळी देणार्‍या मुस्लिमाची प्रतिष्ठा ठरते. सध्यातरी मुस्लिमांना बोकडांचा बळी देण्यापासून कुणी रोखलेले नाही. मात्र, ‘कुर्बानी’च्या नावावर हजारो बोकडांचे कत्तलेआम शहरभर झाले; तर त्याचे परिणाम काय होतात, याची कल्पनाच न केलेली बरी! मात्र, वर्षानुवर्षे हे सगळे चालतच आलेले होते. धार्मिक अधिकाराचा आचरट बुरखा पांघरून या मुस्लीमधार्जिण्या दाढी कुरवाळण्याच्या धंद्याची चलती होती. अल्पसंख्याक असलो म्हणजे, कोणत्याही प्रकारचा कायदा आपण तोडू शकतो व आपल्या मतांचे गठ्ठे ज्यांना आपण विकणार आहोत, त्यांच्याकडून संरक्षण मिळवू शकतो, हा धर्मांध मुस्लिमांचा समज मिरा-भाईंदरच्या हिंदू समाजाने मोडून टाकला.
 
यात एक समोर आलेले मजेशीर प्रकरण म्हणजे ‘वराहपूजना’चे. कुठल्याही धर्मांध मुस्लिमाने एखाद्या हिंदू वस्तीत घर घ्यावे, नंतर तिथे दंगा करावा, स्वच्छतेचे प्रश्न निर्माण करावेत व शेजारीपाजार्‍यांनी कंटाळून घरे विकली की, पडेल भावात आपल्याच भाईबंधांना तिथे आणून वसवावे, हा शिरस्ता दिल्लीतल्या नागरिकांनी सर्वप्रथम मोडला. धर्मांधांना वराह निषिद्ध. त्याचे दर्शनही त्यांच्यासाठी ‘हाय तौबा’. त्यामुळे हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत तुम्ही पाहणार असाल, तर हाच खेळ आम्हीही खेळू शकतो, असा सुस्पष्ट संदेश दिल्लीतल्या हिंदूंनी दिला. वस्तीतल्या घरासमोरील मोकळ्या जागेत गोडगुलाबी दिसणारी गुबगुबीत वराह बाळे बागडू लागली. काही उत्साही मंडळींनी, शहरी मंडळी आपल्या विदेशी श्वानांना गळ्यात पट्टे वगैरे घालून फिरवतात, तशी ‘मोहल्ला प्रदक्षिणा’ही घडवून आणली. याचा जो व्हायचा तो परिणाम झालाच. संपूर्ण कायदेशीर, पूर्ण मानवीय व अहिंसक निषेधाचा हा मार्ग हिंदूंमध्ये लोकप्रिय झाला नसता, तरच नवल होते. ‘मालवणी पॅटर्न’नंतर ‘मालवणी पॅटर्न’ला उत्तर देणारा हा दिल्लीच्या हिंदूंचा हा ‘वराहपालन पॅटर्न’ही अल्पावधीत लोकप्रिय झाला.
 
ठकासी असावे ठक|
उद्धटासी उद्धट|
खटनटासी खटनट|
झालेची पाहिजे॥
 
या समर्थांच्या उक्तीची आठवण करून देणारे हे घटनाप्रसंग होते. वस्तुत: ज्या वाळवंटातून इस्लाम जगभर पसरला, त्याचा आणि गोवंशाचा काहीएक संबंध नाही. मात्र, केवळ हिंदूंना खिजवण्यासाठी गोवंशहत्येची परंपरा धर्मांध मुस्लिमांनी अंगीकारली. या देशातल्या बहुसंख्य हिंदूंच्या भावनांना ठेच देऊन, आपण इथे राहू शकतो, ही भावना बळावली होती. कालच्या घटनाक्रमाने याला ठेच दिली.
 
गेली अनेक वर्षे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणारे हिंदू मुस्लिमांच्या या जाचाला अक्षरश: कंटाळले होते. संघर्षाचे क्षीण सूर गेली काही वर्षे उमटतच होते. मात्र, यावर्षी मिरा-भाईंदर महानगरपालिकेने सोसायटीत वाहने घुसवून तेथील सर्व बोकड बाहेर काढले. वस्तुत: जनावरांच्या कत्तलीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकृत कत्तलखाने असतात. मात्र, केवळ कायदा न मानण्यासाठी अशाप्रकारे घरी नेऊन जनावरांचा बळी देण्याचा आग्रह धरला जातो. ‘बकरी ईद’नंतर या वस्त्यांच्या भोवताली जर फिरलात, तर खूर, कान, शिंग आणि जनावरांच्या शरीराचे त्याज्य भाग या वस्त्यांच्या भोवताली पडलेले असतात. वस्त्यांमधील रस्ते, गल्ल्या, गटारे इथे अक्षरश: या जनावरांच्या रक्ताचे पाट वाहत असतात. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. यंदा मात्र, संकटग्रस्त हिंदूंच्या मदतीला ‘वराहस्वामी’च अवतरले आणि त्यांनी हिंदूंना लढण्याचे बळ दिले.