मेट्रो लाईन ५ चा विस्तार होणार, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम

Total Views |
 
Metro Line 5 Expansion
 
मुंबई : (Metro Line 5 Expansion) मुंबई मेट्रो लाईन ५च्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गिकेची एकूण लांबी आता ३४.२१ किमी झाली असून ती एमएमआरमधील सर्वात मोठ्या मेट्रो मार्गिकांपैकी एक ठरणार आहे. त्याच वेळी, या प्रकल्पाचा पहिला टप्पा आता 'सीएमआरसीए' तपासणीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे.(Metro Line 5 Expansion)
 
यापूर्वी मेट्रो मार्ग ५ ची लांबी २२.३८ किमी होती आणि ११.८३ किमी लांबीच्या मेट्रो मार्ग ५ए च्या समावेशानंतर या संपूर्ण मार्गिकेची एकूण लांबी आता ३४.२१ किमी होणार आहे. विस्तारीकरणानंतर मेट्रो लाईन ५ प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च १८,१३० कोटी इतका आहे. या वर्षाअखेर टप्पा १ सुरू होणे अपेक्षित असून त्यामुळे या संपूर्ण पट्ट्यातील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार असून नव्या मंजुरींमुळे या मार्गिकेची व्याप्ती व प्रभाव दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ होते.(Metro Line 5 Expansion)
 
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, " ५ फेज १ चे काम आता प्रगत टप्प्यात पोहोचले आहे. स्थानकांची पायाभूत सुविधा हळूहळू आकार घेत आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी महत्वाच्या असलेल्या सीएमआरएस तपासणीची आम्ही तयारी करत आहोत. मार्गिका सुरू झाल्यानंतर ‘मुंबई इन मिनिट्स’ या संकल्पनेला मोठी गती मिळेल आणि या भागातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल.”(Metro Line 5 Expansion)
 
विस्तारित मार्गिका आणि प्रकल्पाचा आढावा
 
१) टप्पा १ : ठाणे ते धामणकर नाका
 
लांबी : ११.९ किमी
स्थानके : ६
स्थानकांची नावे : बाळकुम , कशेळी , काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा, धामणकर नाका
अंदाजित खर्च : ₹६,७४१ कोटी
महत्त्वाचे काम : कशेळी मेट्रो कार डेपो येथे PVD द्वारे भू-सुधारणा, इन्स्पेक्शन पिट आणि डेपो कंट्रोल सेंटरची कामे वेगाने सुरू आहेत.
 
२) टप्पा २ : धामणकर नाका ते दुर्गाडी
 
लांबी : १०.४८ किमी
स्थानके : ६ (१ भूमिगत + ५ उन्नत)
स्थानकांची नावे : भिवंडी (भूमिगत), टेमघर, राजनोली, गोवे गाव, कोनगाव (पूर्व), कोनगाव (पश्चिम).
अंदाजित खर्च : ₹७,३२६ कोटी
 
३) टप्पा ५ अ : दुर्गाडी – खडकपाडा – भोईरवाडी – कल्याण तसेच उल्हासनगर जोडणी
 
लांबी : ११.८३ किमी
स्थानके : ७ (सर्व उन्नत)
स्थानकांची नावे : दुर्गाडी, खडकपाडा, भोईरवाडी, छत्रपती शिवाजी महाराज पथ, शांतिनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, उल्हासनगर
विशेष वैशिष्ट्य : भोईरवाडी येथून उल्हासनगरसाठी स्वतंत्र स्पर कनेक्टिव्हिटी
अंदाजित खर्च : ₹४,०६३ कोटी
इंटरचेंज सुविधा :
मेट्रो लाईन ४ येथे बाळकुम (कापूरबावडी).
मेट्रो लाईन १२ येथे कल्याण जंक्शन.
 
उपनगरीय रेल्वे स्थानकांशी थेट जोडणी :
  • ठाणे
  • कल्याण
  • विठ्ठलवाडी
  • उल्हासनगर 
“मेट्रो लाईन ५ ही मुंबई महानगर प्रदेशासाठी अत्यंत महत्त्वाची मार्गिका आहे, विशेषतः भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली परिसरासाठी, जे या प्रदेशातील सर्वात महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांपैकी आहे. हा विस्तारित कॉरिडॉर उपनगरीय रेल्वे आणि प्रमुख महामार्गांशी सुरळीतपणे जोडला जाईल, ज्यामुळे लाखो नागरिकांना अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास मिळेल. मला विश्वास आहे की, टप्पा १ या वर्षाअखेर नागरिकांसाठी खुला होईल.”(Metro Line 5 Expansion)
 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
“आशियातील सर्वात मोठ्या वस्त्रोद्योग आणि वेअरहाऊसिंग हबपैकी एक असलेल्या भिवंडीला दाट लोकवस्तीच्या कल्याण-डोंबिवली प्रदेशाशी हा मार्ग जोडतो. उपनगरीय रेल्वे आणि प्रमुख महामार्गांशी एकीकरणामुळे, मेट्रो लाईन ५ लाखो कामगार, व्यापारी आणि नागरिकांना सेवा देईल आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देणारा एक प्रमुख घटक म्हणून काम करेल.”(Metro Line 5 Expansion)
 
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.