लोढा फाऊंडेशनच्या वतीने 'लोढा थेरोटिकल फिजिक्स इन्सिट्युट'चा शुभारंभ

    28-May-2026   
Total Views |
 
Lodha Foundation Mumbai
 
मुंबई : (Lodha Foundation Mumbai) विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला बळ देण्याच्या उद्देशाने लोढा फाऊंडेशने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. मुंबई येथे 'लोढा थेरोटिकल फिजिक्स इन्सिट्युट'चा (एलटीपीआय) शुभारंभ करण्यात आला असून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी हा कार्यक्रम पार पडला. (Lodha Foundation Mumbai)
 
यावेळी लोढा फाऊंडेशनच्या विश्वस्त मंजू लोढा, अभिषेक लोढा यांच्यासह भौतिकशास्त्रज्ञ तथा वुल्फ पुरस्कार विजेचे प्रा. जैनेंद्र जैन उपस्थित होते. याविषयी बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "भारत जागतिक स्तरावर एक अग्रणी राष्ट्र म्हणून उदयास येण्याचे ध्येय बाळगत असताना, संशोधन, नावीन्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून या वाटचालीस बळकटी देणे अत्यंत गरजेचे ठरते. एलटीपीआयमध्ये एक अग्रगण्य संशोधन संस्था म्हणून विकसित होण्याची प्रचंड क्षमता आहे आणि याद्वारे जागतिक वैज्ञानिक नकाशावर भारताचे स्थान अधिक ठळक करण्यात ही संस्था अर्थपूर्ण योगदान देऊ शकेल." (Lodha Foundation Mumbai)
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....