कृष्णराज महाडिक यांनी घेतली पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट...

    28-May-2026
Total Views |
Krushnaraj Mahadik Meets DGP Date
 
मुंबई : (Krushnaraj Mahadik Meets DGP Date) भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची बुधवार दि.२७ रोजी भेट घेऊन राज्यातील वाढता ड्रग्सचा विळखा, युवकांचे भविष्य आणि महिला सुरक्षेच्या गंभीर विषयांवर सविस्तर चर्चा केली. याबाबतची माहिती महाडिक यांनी आपल्या एक्स हँडलवरून गुरुवार दि.२८ रोजी दिली आहे.(Krushnaraj Mahadik Meets DGP Date)
 
"महाराष्ट्र सुरक्षित, सक्षम आणि व्यसनमुक्त करण्यासाठी कठोर कारवाई, जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणी यावर भर देण्याची मागणी केली.युवकांचे भविष्य आणि माताभगिनींची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता.भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र पोलीस दलाच्या सोबतीने आणि सहकार्याने राज्यभर या विषयांवर जनजागृती अभियान राबवण्यास इच्छुक आणि तत्पर असल्याची ग्वाही सुद्धा त्यांना दिली"अशी प्रतिक्रिया यावेळी कृष्णराज महाडिक यांनी दिली आहे.(Krushnaraj Mahadik Meets DGP Date)