मुंबई : (Goregaon Qurbani Dispute Resolved) बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गोरेगाव परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीत कुर्बानी देण्यावरून निर्माण झालेला वाद अखेर शांततेत मिटला. मुंबई महापालिकेने सोसायटीच्या आवारात कुर्बानी देण्यास दिलेली परवानगी ऐनवेळी रद्द केल्यामुळे मुस्लिम समाजात काहीशी नाराजी पसरली होती. मात्र, प्रशासनाची कडक भूमिका आणि कायदा-सुव्यवस्थेचा मान राखत रहिवाशांनी सामोपचाराचा मार्ग निवडला आणि सोसायटीऐवजी जवळच्याच एका कत्तलखान्यात कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला.(Goregaon Qurbani Dispute Resolved)
गोरेगाव (पूर्व) येथील गोकुळधाम, आरे भास्कर रोडवरील 'सॅटेलाइट गार्डन फेज-२' च्या आझाद नगर डी-३ बिल्डिंग मधील स्थानिक मुस्लीम रहिवाशांच्या मते, परिसरात बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्यासाठी आधी पालिकेने शेड उभारण्यास मंजुरी दिली होती. मात्र, काही कारणास्तव ती परवानगी ऐनवेळी रद्द केली. पालिकेच्या या नव्या आदेशामुळे सोसायटीतील मुस्लिम बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. "एकदा परवानगी दिल्यानंतर प्रशासनाने ती का रद्द केली?" असा सवालही काही नागरिकांकडून उपस्थित केला जात होता.(Goregaon Qurbani Dispute Resolved)
मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने घेतलेली कडक भूमिका पाहता, सोसायटीत कोणताही वाद किंवा तणाव निर्माण होऊ नये यासाठी रहिवाशांनी एकत्र येत एक मोठा निर्णय घेतला. प्रशासनाच्या नियमांचा आदर करत त्यांनी सोसायटीच्या आवारात कुर्बानी न देण्याचे ठरवले. त्याऐवजी, सोसायटीच्या जवळच असलेल्या एका कत्तलखान्याच्या परिसरात सर्व बकरे नेण्यात आले आणि तेथे ही धार्मिक रीत पूर्ण करण्यात आली.(Goregaon Qurbani Dispute Resolved)
पोलिसांनी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच घेतलेल्या पुढाकारामुळे आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या सामंजस्यामुळे गोरेगाव परिसरातील संभाव्य वाद टाळण्यात यश आले. सोसायटीच्या आवारात होणारी ही प्रक्रिया आता पूर्णपणे टळली असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे नियंत्रणात आणि शांततेत आहे. रहिवाशांनी घेतलेल्या या समजूतदार भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.(Goregaon Qurbani Dispute Resolved)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक