जहाज पुनर्वापरातून महसूलवाढीस चालना;वापरात नसलेल्या बोटींच्या पुनर्वापराचे प्रस्ताव सादर करा;मंत्री नितेश राणे यांच्या सूचना

Total Views |
Nitesh Rane
 
मुंबई : (Nitesh Rane) राज्यातील वापरात नसलेल्या बोटी आणि जहाजांच्या पुनर्वापरासाठी सक्षम यंत्रणा उभारणे ही काळाची गरज आहे. यामुळे पर्यावरणपूरक व्यवस्थापनास चालना मिळेलच, शिवाय स्क्रॅप प्रक्रियेतून महसूल निर्मितीचे नवीन मार्गही उपलब्ध होतील. विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण प्रक्रियेचा सविस्तर अभ्यास करून प्रभावी धोरण आखण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.
 
मंत्रालयात सोमवार, दि.२५ रोजी आयोजित जहाज पुर्नावापरा संदर्भात आयोजित बैठकीत मंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी आणि राम हरित जहाज पुनर्वापर उद्योग एलएलपी (युनिट-२)चे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
यावेळी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले,राज्यातील वापरात नसलेल्या बोटी व जहाजांच्या पुनर्वापर प्रक्रियेला गती देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे.
 
 
श्रीराम हरित जहाज पुनर्वापर उद्योग (युनिट-२) एलएलपी यांनी राज्यातील वापरात नसलेल्या बोटी व जहाजांचा पुनर्वापर करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावा. विशेषतः इनलँड वेस्सेल तसेच मोठ्या जहाजांसाठी एक खिडकी प्रणाली विकसित करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा, अशा सूचना राणे यांनी दिल्या.
 
या विषयावर विभागामार्फत सखोल अभ्यास करण्यात येईल व तो आगामी बोर्ड बैठकीत मांडण्यात येईल. तसेच स्क्रॅप मध्ये काढायच्या बोटींची शॉर्टलिस्ट तयार करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सागरी क्षेत्रात शाश्वत विकासाला चालना मिळण्यासोबतच जहाज पुनर्वापर उद्योगाला नवी दिशा मिळणार असल्याचेही यावेळी राणे यांनी सांगितले. (Nitesh Rane)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.