१४० कोटी भारतीयांच्या सेवेसाठी नरेंद्र मोदी यांनी स्वतःला समर्पित केले आहे - संजय उपाध्याय

    27-May-2026
Total Views |
Sanjay Upadhyay
 
मुंबई : (Narendra Modi) "आजच्याच दिवशी, १२ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि त्या एका शपथेसह देशाने परिवर्तनाच्या नव्या पर्वात प्रवेश केला.
 
त्या क्षणाशी एक संकल्प जोडलेला होता, “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास.”गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा संकल्पच आपल्या जीवनाचे ध्येय मानत १४० कोटी भारतीयांच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित केले आहे."अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी आपल्या एक्स हँडलवरून मंगळवार दि.२६ रोजी व्यक्त केली आहे.(Narendra Modi)
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीस १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आमदार संजय उपाध्याय यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.(Narendra Modi)
 
हेही वाचा : विधानपरिषद निवडणूकीसंदर्भात तिन्ही पक्षांची चर्चा सुरु;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; एकत्रित बसून मार्ग काढू
 
"त्यांची अथक मेहनत, स्पष्ट दृष्टी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्याच बळावर आज भारत केवळ विकास करत नाही, तर आत्मविश्वास, सामर्थ्य आणि गौरवासह जगासमोर नवी ओळख निर्माण करत आहे.
 
गरीबांच्या सन्मानापासून ते युवकांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्यापर्यंत, महिलांच्या सक्षमीकरणापासून ते जागतिक मंचावर भारताचा वाढता गौरव प्रस्थापित करण्यापर्यंत ही १२ वर्षे केवळ एका सरकारची नाहीत, तर नवभारताच्या उदयाची साक्ष आहेत." असेही संजय उपाध्याय म्हणाले आहेत.(Narendra Modi)