बकरी ईदला सोसायटीत बकरा चालतो मग डुक्कर का नाही? : मिरा रोडमध्ये सोसायटीत हिंदूंनी जिहाद्यांना आणले जेरीस!

    26-May-2026
Total Views |

Mira Road Violence
 
मुंबई : (Mira Road Violence) बकरीदपूर्वी मीरा रोड परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. निवासी संकुलामध्ये बकरा ठेवणे आणि त्यांची कुर्बानी देण्याच्या मुद्द्यावरून सुरु झालेला वाद पुढे तीव्र आंदोलनांमध्ये परिवर्तित झाला. कालांतराने वाद हिंसक वळणावर गेल्याचेही दिसून आले. पूनम क्लस्टर ०१ सोसायटीत रात्री उशिरा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर चाकू हल्ला झाल्याचेही निदर्शनास आले. या हल्ल्यात एका कार्यकर्त्याचा हाताचा पंजा कापला गेला असून, अन्य एका अल्पवयीन मुलालाही मारहाण झाली. सदर प्रकरणी अब्दुल रहीम या हल्लेखोराविरोधात कशिमिरा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ मे रोजी पूनम क्लस्टर ०१ सोसायटीमध्ये बकऱ्या बांधल्यावरून दोन गटांत वाद सुरू असल्याची माहिती बजरंग दलाचे मिरा भाईंदर शहराध्यक्ष पवन ठाकूर यांना मिळाली. सकाळी १० वाजताच्या सुमारास पवन ठाकूर यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट दिली. त्यांनी दोन्ही बाजूंच्या लोकांना शांत राहण्याचे आवाहन करत, सोसायटी परिसरातून बकऱ्या हटवण्याची आणि पुढे येथे कोणीही बकऱ्या आणणार नाही, अशी विनंती करून सामोपचाराने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील काही धर्मांध मुस्लिमांनी या समजूतीला विरोध करत गोंधळ घालण्याचा व अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला.
 
 
 
त्यानंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहराध्यक्ष पवन ठाकूर यांनी बजरंग दलाचे जिल्हा मंत्री नागनाथ कांबळे यांना फोन करून काही कार्यकर्त्यांसह पूनम क्लस्टर ०१ जवळ येण्यास सांगितले. त्यानुसार जिल्हा मंत्र्यांच्या सूचनेवरून कार्यकर्ते रात्री पूनम क्लस्टर ०१ च्या मुख्य गेटबाहेर जमा झाले. रात्री १२:५० वाजताच्या सुमारास जिल्हा मंत्री नागनाथ कांबळे हे सोसायटीतील हिंदू रहिवासी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. सोसायटीमधील बकऱ्या बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मिळून पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल करावी आणि संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे आश्वासन कांबळे रहिवाशांना देत होते.(Mira Road Violence)
 
 
ही चर्चा सुरू असतानाच, नागनाथ कांबळे यांच्या पाठीमागे आणि तक्रारदाराच्या उजव्या बाजूला अब्दुल रहीम नावाचा इसम घुटमळत होता. या धर्मांध जिहाद्याने अचानक पाठीमागून नागनाथ कांबळे यांच्यावर चाकूने प्राणघातक वार करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला होत असल्याचे पाहून जवळच उभ्या असलेल्या सतर्क कार्यकर्त्याने कांबळे यांना वाचवण्यासाठी आपला डावा हात मध्ये घातला. यामुळे चाकूचा वार कार्यकर्त्याच्या डाव्या हाताच्या पंजावर बसला आणि पंजा कापला जाऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला.(Mira Road Violence)
 
हल्ल्यानंतर जखमी कार्यकर्ता आणि त्यांच्या मागे उभा असलेल्या एका अल्पवयीन हिंदू मुलाने अब्दुल रहीम यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोराने त्यालादेखील मारहाण करण्यास सुरुवात केली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कार्यकर्त्याला तात्काळ उपचारासाठी भाईंदर (पश्चिम) येथील पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट कशिमिरा पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराबाबत रीतसर तक्रार दाखल केली. आरोपी अब्दुल रहीम सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम ११५(२) व ११८ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 
समाजविघातक प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी
 
हिंदू समाजाच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आणि जागृत असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे धर्मांध जिहाद्याचा भ्याड कट त्याच क्षणी उधळून लावण्यात आला. कार्यकर्ता हर्षसिंग यांनी प्रसंगावधान राखून अत्यंत धाडसाने त्या हल्लेखोराला पकडले. या झटापटीत त्यांच्या हातावर वार झाला, तरीही कार्यकर्त्यांनी माघार न घेता हल्लेखोराला घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्याला पुन्हा पकडून कायद्याच्या ताब्यात देण्यात आले.
 
 
 
आज परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की काही कट्टर आणि समाजात अशांतता निर्माण करणारे घटक आता गर्दीत घुसून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर उघडपणे जीवघेणे हल्ले करण्याचे धाडस करत आहेत. हा केवळ माझ्यावरचा हल्ला नसून हिंदू समाजाचा आवाज दाबण्याचा आणि हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा एक घृणास्पद प्रयत्न आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल स्पष्ट इशारा देत आहेत की हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी व स्वाभिमानासाठी संघर्ष करणारे कार्यकर्ते कोणत्याही दबावाला किंवा कटकारस्थानांना घाबरणार नाहीत. प्रशासनाने अशा समाजविघातक प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा हिंदू समाज लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यास बाध्य होईल.(Mira Road Violence)
– नागनाथ शामराव कांबळे
 
जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद - भाईंदर जिल्हा
 
जमाव पांगवण्यासाठी काही ठिकाणी लाठीचार्ज
 
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सायंकाळी उशिरा हटवण्यात आलेले शेड पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर हिंदू रहिवासी आणि स्थानिक संघटनांनी पुन्हा आंदोलन सुरू केले. सुरुवातीला झालेली शाब्दिक चकमक नंतर धक्काबुक्की आणि झटापटीत परिवर्तित झाली. जमाव वाढत असल्याने आणि परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप केला. जमाव पांगवण्यासाठी काही ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या पूनम क्लस्टर सोसायटी आणि बकरा मंडी परिसरासह संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे.
 
 
  
आंदोलकांनी आणले डुक्कर
 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, आंदोलकांनी प्रश्न उपस्थित केला की, सोसायटी परिसरात बकरीदसाठी बकऱ्यांना परवानगी दिली जात असेल, तर त्या परिसरात डुक्कर आणण्यास आक्षेप का घेतला जात आहे? त्यानुसार आंदोलकांनी बकरा मंडी आंदोलनस्थळी एक डुक्कर आणला. या घटनेमुळे परिसरातील तणाव झपाट्याने वाढला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखले. त्यानंतर दोन्ही समुदायांतील सदस्यांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली, ज्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 
महापौर, आमदारांकडून कुर्बानीविरोधात कठोर कारवाईची मागणी
 
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केला की काही कट्टरपंथी मुस्लिम नेते मुंबईत उघडपणे कुर्बानी देण्यास परवानगी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, या मुद्द्यावर भाजप नेत्यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेतल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटले की, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि भाजपच्या अनेक आमदारांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांना पत्र लिहून हाउसिंग कॉम्प्लेक्समध्ये होणाऱ्या कथित बेकायदेशीर कुर्बानीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.(Mira Road Violence)