बेकायदेशीर कुर्बानीचा वाद पेटला, मिरारारोडमध्ये बकऱ्या ठेवण्यावरुन राडा, मुंबईतील सोसायट्यांकडे भाजपचं लक्ष
26-May-2026
Total Views |
मुंबई : (Bakri Eid Mumbai Society) बकरी ईदपूर्वी मिरा रोड परिसरात एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये बकऱ्या ठेवण्याच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला असून हा वाद हिंसक वळणावर गेला. त्याचवेळी भाजपने मुंबईतील विविध सोसायट्यांमध्ये होणाऱ्या कथित “बेकायदेशीर कुर्बानी”बाबत चिंता व्यक्त करत प्रशासनावर दबाव वाढवला आहे.
बकरी ईदपूर्वी मिरा रोडमधील सोसायटीत तणाव
मिरा रोड येथील पूनम इस्टेट क्लस्टर-1 या सोसायटीत हा वाद सुरू झाला. बकरी ईदसाठी सुमारे 25 बकऱ्या सोसायटीच्या परिसरात आणून तात्पुरत्या शेडमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकाराला स्थानिकांनी विरोध दर्शवला. सोसायटीची अधिकृत बैठक किंवा सर्व रहिवाशांची संमती न घेता शेड उभारण्यास परवानगी कशी देण्यात आली, असा आक्षेप नोंदवण्यात आला. काही रहिवाशांनी बकऱ्यांमुळे सोसायटीत गैरसोय होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर स्थानिक भाजप नेते, हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आणि रहिवाशांच्या तक्रारीनंतर काशीमिरा पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने हे तात्पुरते शेड हटवण्यात आले. (Bakri Eid Mumbai Society)
शेड हटवल्यानंतरही बकऱ्या सोसायटीच्या परिसरातच असल्याने रात्री उशिरा पुन्हा तणाव निर्माण झाला. जोरदार वाद आणि गोंधळाच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने एका तरुणावर ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तणाव टाळण्यासाठी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सोसायटी परिसरात कुर्बानीसाठी परवानगी देण्यात आलेली नव्हती. बकरी ईदपर्यंत बकऱ्या तात्पुरत्या ठेवण्यासाठीच ही व्यवस्था करण्यात आली होती. (Bakri Eid Mumbai Society)
Bajrang Dal got no Chill🤣
The controversy surrounding the Bakra Mandi area in Mira Road intensified, with Bajrang Dal activists taking their protest to a more aggressive level. According to reports, protesters brought a pig to the site of the incident and attempted to move it… pic.twitter.com/oh4low2bh2
— The Jaipur Dialogues (@JaipurDialogues) May 26, 2026
बेकायदेशीर कुर्बानीच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक
या मुद्द्यावरुन मुंबईचं राजकारणही तापलेलं आहे. बकरी ईददरम्यान गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कथित बेकायदेशीर प्राण्यांची कुर्बानी रोखण्यासाठी भाजप नेत्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मुंबईच्या महापौर रीतू तावडे यांनी अनेक भाजप आमदार आणि वरिष्ठ नेत्यांसह मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांना पत्र लिहून सोसायट्यांमधील कुर्बानीसंदर्भात नियमभंगावर कडक नजर ठेवण्याची आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या पत्रावर मिहिर कोटेचा, अतुल भातखळकर, मनीषा चौधरी, पराग शाह आणि संजय उपाध्याय यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सह्या असल्याची माहिती आहे. (Bakri Eid Mumbai Society)