मौखिक आरोग्य तपासणी शिबिरास अदिती तटकरे यांनी दिली भेट

    26-May-2026
Total Views |
 Aditi Tatkare Mumbai visit
 
मुंबई : (Aditi Tatkare Mumbai visit) तंबाखूविरोधी मोहीमेचा भाग म्हणून सलाम मुंबई फाऊंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय, मुंबई येथे दि.२५ मे रोजी मौखिक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरास महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी भेट दिली व माहिती जाणून घेतली.यावेळी सलाम मुंबई फाऊंडेशनचे जनरल मॅनेजर नारायण लाड यांनी तटकरे यांचे स्वागत केले.
 
"शिबिरास मंत्रालयातील कर्मचारी तसेच मंत्रालयात येणारे नागरिक यांची मोफत मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. दुपारपर्यंत ३०० लोकांनी याचा लाभ घेतला असून सदर तपासणीसाठी हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मुंबई येथील तज्ञ डॉक्टर सहभागी झाले आहेत.
 
हेही वाचा : इंधन बचतीचा संघाचा अभिनव प्रयोग; जळगावच्या कार्यकर्ता विकास वर्गात एलपीजीला पर्याय; पर्यावरणपूरक व किफायतशीर शेगडीची चर्चा  
 
या उपक्रमामुळे तंबाखूजन्य मुखरोग, तोंडाचा कर्करोग व इतर आजारांचे लवकर निदान होण्यास मदत होईल. तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तंबाखूमुक्त जीवनशैलीबाबत जनजागृती निर्माण होईल. राज्य शासनाच्या आरोग्यदायी महाराष्ट्र अभियानास या उपक्रमातून प्रभावी बळ मिळेल."अशी माहिती सलाम मुंबई फाऊंडेशनचे दीपक पाटील यांनी दिली. (Aditi Tatkare Mumbai visit)