मुंबई : (West Bengal Gangster Akash Singh) पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्ववादी शुभेंदू अधिकारी यांचे सरकार स्थापन होताच राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यास सुरुवात झाली आहे. याच अनुषंगाने पोलिसांनी हावड्याचा गँगस्टर आकाश सिंग याला अर्धनग्नावस्थेत (चड्डी आणि बनियनमध्ये) रस्त्यावर फिरवले. पोलिसांनी काढलेल्या या धिंडचा व्हिडिओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश सिंग स्वतःला हावड्याचा मोठा गँगस्टर म्हणवून घेत असे, जो तृणमूल काँग्रेस सरकारच्या काळात बिनधास्तपणे कार्यरत होता. राज्यात भाजप सरकार आल्यानंतर आणि गुन्हेगारांविरोधातील कारवाई सुरू झाल्यानंतर आकाश सिंग याचाही नंबर लागला.
पोलिसांनी त्याला गोळीबार करून पोलिसांवर हल्ला करणे, खंडणी वसुली टोळी चालवणे आणि अनेक गुन्हेगारी कारवायांच्या आरोपाखाली अटक केली.(West Bengal Gangster Akash Singh)
अटकेनंतर आकाश सिंगला मालीपांचघरा आणि गोलाबाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत क्राइम रिकन्स्ट्रक्शनसाठी नेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, या प्रक्रियेचा उद्देश आरोपीने गुन्ह्याचे नियोजन कसे केले, कोणाची मदत घेतली आणि घटना कशी घडवली हे समजून घेणे हा होता.
पोलिसांनी असेही सांगितले की या प्रक्रियेत अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत, जे पुढील तपासात उपयुक्त ठरतील.(West Bengal Gangster Akash Singh)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक