'जिम जिहाद'चा मिर्झापूरमध्ये पर्दाफाश;इमरान खान, मौलवी खलीलुर रहमान सह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

    25-May-2026   
Total Views |
Uttar Pradesh
 
मुंबई : (Uttar Pradesh 'Gym Jihad' Case) उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात 'जिम जिहाद' प्रकरणी चर्चेत आलेल्या एका टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. फिटनेस आणि जिम ट्रेनिंगच्या नावाखाली काही जण तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचा आरोप आहे.
 
या प्रकरणात मुख्य आरोपी इमरान खान आणि मौलवी खलीलुर रहमान यांच्यासह दहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून त्यांच्या पाच जिमनाही सील करण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीत आलम, फैजल, जहीर, शादाब, अश्वाक, साहिल आणि इर्शाद यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. तरुणींवर टप्प्याटप्प्याने धार्मिक दबाव टाकला जात होता, असा आरोपही करण्यात आला आहे.
 
त्यांना बुर्का परिधान करण्यास, दर्ग्यांवर नेण्यास आणि धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
 
या संपूर्ण प्रकरणात सानू नावाच्या एका महिलेचाही सहभाग समोर आला आहे. ती तरुणींचा विश्वास संपादन करण्याचे काम करत होती, ज्यामुळे टोळीला त्यांना सहजपणे जाळ्यात ओढणे शक्य होत होते, अशी माहिती आहे.
 
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पोलिस दलातील एका हेड कॉन्स्टेबल इर्शाद याच्यावरही या टोळीला मदत केल्याचा आरोप आहे. जानेवारी महिन्यात काही पीडित तरुणींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
 
त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि हळूहळू संपूर्ण नेटवर्क समोर आले. पुढे प्रशासनाने कठोर कारवाई करत आरोपींवर गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आणि त्यांची जिम केंद्रे बंद केली.(Uttar Pradesh 'Gym Jihad' Case)
 
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक