जीपीआर 2.0 अंतर्गत म्हाडाकडून डिजिटल प्रशासनाला गती;म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते लोकार्पण

Total Views |
MHADA Inauguration Ceremony
 
मुंबई : (MHADA Inauguration Ceremony) महाराष्ट्र शासनाच्या जीपीआर 2.0 या प्रशासकीय सुधारणा उपक्रमांतर्गत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय विभागांचे सक्षमीकरण करून नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने म्हाडाकडून आज दोन महत्त्वपूर्ण डिजिटल सुविधांचे लोकार्पण करण्यात आले.
 
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात आयोजित ‘गो लाईव्ह’ कार्यक्रमात नागरिकांसाठी अद्ययावत करण्यात आलेली ‘सीएफसी @ Home’ प्रणाली तसेच अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी ऑनलाइन वेळ निश्चित करणारी अभ्यांगत व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच ‘व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम' ही सुविधा आजपासून कार्यान्वित करण्यात आली.
 
शासनाच्या GPR 2.0 धोरणानुसार पारंपरिक कार्यालयीन प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान करून त्या पूर्णपणे डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या दिशेने म्हाडाने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.(MHADA Inauguration Ceremony)
 
याप्रसंगी बोलतांना संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, सामाजिक बांधिलकीच्या तत्वावर कार्यरत म्हाडा ही गृहनिर्माण संस्था नागरिककेंद्रित सेवा देणारी आधुनिक आणि उत्तरदायी संस्था बनावी हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. शासनाच्या GPR 2.0 उपक्रमाच्या अनुषंगाने प्रशासनातील प्रक्रिया सुलभ करून त्या अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे.
 
या सुविधांमुळे नागरिकांना अधिक पारदर्शक, सुलभ आणि वेळेची बचत करणाऱ्या सेवा घरबसल्या उपलब्ध होतील. कामाचा पाठपुरावा देखील त्यांना या प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन करता येणार आहे.(MHADA Inauguration Ceremony)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.