लोकहिताच्या प्रभावी मांडणीला राष्ट्रीय सन्मान संसद रत्न पुरस्कार २०२६ - चंद्रकांत पाटील

    24-May-2026
Total Views |
Sansad Ratna Puraskar
 
मुंबई : (Sansad Ratna Puraskar ) "लोकहिताच्या प्रभावी मांडणीला राष्ट्रीय सन्मान ‘संसद रत्न पुरस्कार २०२६ 'मध्ये महाराष्ट्राचे मानकरी.आपल्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना संसदेत आक्रमकपणे मांडणे आणि लोककल्याणासाठी सतत झटत राहणे, याच तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना मिळालेली ही पोचपावती आहे.
 
महाराष्ट्राची ही वैभवशाली परंपरा आपण अशीच पुढे चालू ठेवाल, हा ठाम विश्वास आहे.आपल्या पुढील यशस्वी संसदीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा!" अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून दिली आहे.(Sansad Ratna Puraskar)
 
 हेही वाचा : महाराष्ट्राची ओळख अधोरेखित निर्णायक घटक म्हणजे खुद्द देवेंद्र फडणवीस - कौस्तुभ धवसे
 
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालघरचे खासदार हेमंत सावरा, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ आणि राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी यांची ' संसद रत्न पुरस्कार २०२६’ (Sansad Ratna Puraskar ) साठी निवड झाली आहे.
 
त्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून रविवार दि.२४ रोजी त्यांचे अभिनंदन केले आहे.(Sansad Ratna Puraskar )