नागपूर हे देशातील एक लॉजिस्टिक हब होतंय - देवेंद्र फडणवीस
24-May-2026
Total Views |
मुंबई : (Industrial Development Maharashtra) "उद्योग,लॉजिस्टिक,मँनुफँक्चरींग मध्ये खूप मोठा फायदा नागपूरला होणार आहे.गेल्या काही काळात आपण जी लॉजिस्टिक पॉलीसी तयार केली. त्यामुळे नागपूर हे देशातील एक लॉजिस्टिक हब होतय.त्यामुळे जे पार्ट तयार होतात त्याने खर्च कमी होणार आहे.
आपल्याला ग्लॉबली कंपीटिटीव व्हायच असेल,ग्लॉबल सप्लाय चेनचा भाग व्हायच असेल तर लॉजिस्टिक खर्च कमी करण महत्वाच आहे.तेच काम आपण या माध्यमातून करतो आहोत.
लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो.तसेच समृध्दीच्या विस्तारामुळे जो पूर्व विदर्भ आहे तो औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल."असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार दि.२४ रोजी केले.
गोदाम लॉजिस्टिक पार्क या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नागपूरमध्ये आले असता माध्यमांशी ते बोलत होते.(Industrial Development Maharashtra)
राहुल गांधी यांच्या केंद्र सरकार कोसळ्याच्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "राहुल गांधी यांची टीका म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने यापलीकडे काही नाही.तर नाना पटोले यांना पक्षात कोण विचारेना झालेत. पक्षाचा एक अध्यक्ष त्यांच्या बाजूने नाही आहे त्याचा राग आमच्यावर कशाला काढत आहेत."(Industrial Development Maharashtra)