उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर तर गिरीश महाजन देखील दिल्लीत जाणार

    24-May-2026
Total Views |
Eknath Shinde Delhi visit
 
मुंबई : (Eknath Shinde Delhi Visit) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवार दि.२३ रोजी दिल्ली दौऱ्यावर गेल्याने चर्चांना उधाण  आले आहे. विधान परिषद निवडणूक जवळ येऊन ठेपली असून सोमवार दि.२५ पासून नामनिर्देशन पत्र दाखल करणे सुरू होणार आहे.
 
एकूण विधान परिषदेच्या जागापैकी भाजप १० जागांवर तर शिवसेना ७ जागांसाठी आग्रही आहे.त्यापैकी ४ जागांवरचा तिढा वाढलेला आहे.जागांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक बैठक देखील काही दिवसापूर्वी पार पडली.
 
पण आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Delhi visit) यांच्यापाठोपाठ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन देखील दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मी तिकिटासाठी नाही तर वेगळ्या कामासाठी दिल्लीत जातोय.धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात तारीख आहे त्या संदर्भात मी दिल्ली जात आहे असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवार दि.२४ रोजी स्पष्ट केले आहे.
 
 
" उद्यापासून नामनिर्देशन पत्र भरणे सुरू आहे. आम्ही महायुती म्हणून लढतो आहोत.एक दोन जागेबाबत तिढा आहे पण तो लवकरच सुटेल. जागा वाटपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चर्चा करून निर्णय घेतील.चर्चा करून सर्व विषय सुटतील व सन्माननीय तोडगा निघेल.ज्यांचे जेवढे संख्याबळ आहे त्यानुसार मेरिट वर जागा वाटप होईल." असे स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे रविवार दि.२४ रोजी पत्रकारांशी बोलताना दिले आहे.(Eknath Shinde Delhi Visit)