पहिला मुख्यमंत्री बनतात की मंत्री बनतात हे उद्धव ठाकरेंनी सांगावे - बच्चू कडू

    24-May-2026
Total Views |
Bachchu Kadu
 
मुंबई : (Bachchu Kadu) "लोक एवढे मूर्ख नाही आहेत. उद्धव ठाकरेंनी सांगावे की पहिला मुख्यमंत्री बनतात की मंत्री बनतात. जर पहिला मंत्री बनत असेल तर त्यांच बरोबर आहे आणि जर पहिला मुख्यमंत्री बनत असेल तर आमच बरोबर आहे.
 
एकनाथ शिंदे यांनी तेव्हा पुढाकार घेतला मग आम्ही उद्धव ठाकरेंच्या घरी गेलो आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही एक एक महिना बाहेर होतो. या गोष्टी उद्धव ठाकरे का सांगत नाहीत. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बोलावणे असताना देखील तेव्हा उद्धव ठाकरेंच्या साठी आम्ही ठाम राहिलो."अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी दिली.
 
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया एका खाजगी वृत्त वाहिनीस देताना आमदार बच्चू कडू शनिवार दि.२३ रोजी बोलत होते. (Bachchu Kadu)
 
 
"आम्ही त्यांना घरी येऊन पाठिंबा दिला हे सांगायला विसरू नये. मला ते कॅबिनेट देणार होते पण राज्यमंत्री पद दिले. मला एकट्यालाच नाही तर तीन अपक्षांना त्यांनी मंत्री केले होते.ते का केले हे त्यांना विचारावे ? कारण त्यांना स्वतःचे संख्याबळ जास्त दाखवायचे होते.तसेच मी बंडखोरी केली म्हणायला माझा स्वतंत्र पक्ष आहे.
 
माझ्या विरोधात शिवसेनेने उमेदवार देखील उभा केला होता त्यासाठी उद्धव ठाकरे प्रचाराला देखील आले होते." असेही कडू म्हणाले.(Bachchu Kadu)