मुंबई : (Aaditya Thackeray) उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवार दि.२४ रोजी शिवतीर्थवर मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांची भेट घेतली.आदित्य ठाकरे यांनी यावेळी काका राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचीही भेट घेतली.
यावेळी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी अमित ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अमित ठाकरे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. राज्यभरातून मनसैनिक यावेळी उपस्थित होते.
सर्वप्रथम मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने ठाकरे बंधूंच्या एकमेकांच्या घरी भेटीगाठी वाढल्या होत्या. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची शिवतीर्थवरील ही भेट अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पहायला मिळाली. (Aaditya Thackeray)