पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान' उपक्रमाअंतर्गत भाजपा वसई-विरार जिल्हा प्रशिक्षण वर्ग संपन्न

    23-May-2026
Total Views |
Rambhau Mhalgi Prabodhini Training
 
मुंबई : (Rambhau Mhalgi Prabodhini Training) 'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान' उपक्रमाअंतर्गत भाजपा वसई-विरार जिल्हा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे पार पडला.
 
या प्रशिक्षण वर्गाला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याबाबतची माहिती आमदार रविंद्र चव्हाण यांनी आपल्या एक्स हँडलवरून शनिवार दि.२३ रोजी दिली आहे.
 
हेही वाचा : जागतिक भागीदारीसाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; भारत-सायप्रस आर्थिक भागीदारीसाठी पुढील दशक निर्णायक
 
याप्रसंगी आमदार राजन नाईक, वसई-विरार जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील, वसई-विरार महापालिकेचे विरोधी पक्ष नेते मनोज पाटील, अशोक शेळके यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
"विकासाभिमुख व लोकाभिमुख कार्यशैली हीच आपल्या भाजपा परिवाराची ओळख आहे. याच विचारधारेतून प्रेरित होऊन राष्ट्रहित आणि समाजहितासाठी समर्पित कार्यकर्ते घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे प्रशिक्षण वर्ग करत आहे." अशी प्रतिक्रिया यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. (Rambhau Mhalgi Prabodhini Training)