एस.आर.ए. जनता दरबार ,नागरिकांच्या हक्कांसाठी थेट संवाद! - आशिष शेलार

    22-May-2026
Total Views |
SRA Camp Mumbai
 
मुंबई : (SRA Camp Mumbai) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात “एस.आर.ए. जनता दरबार” या विशेष शिबिराचे आयोजन सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.यावेळी उपस्थितांशी मंत्री शेलार यांनी संवाद साधला.
 
"एस.आर.ए. जनता दरबार ,नागरिकांच्या हक्कांसाठी थेट संवाद. झोपडपट्टीतील रहिवाशांच्या विविध समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी आयोजित या शिबिरामध्ये एसआरए विभागामार्फत बायोमेट्रिक प्रक्रियेतील अडचणी, प्रलंबित भाडे, पात्रता संदर्भातील तक्रारी, सदनिका वाटप तसेच पुनर्वसन योजनांशी संबंधित विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करून तातडीने निवारण करण्यात आले.या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला." अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड आशिष शेलार यांनी आपल्या एक्स हँडलवरून शुक्रवार दि.२२ रोजी दिली आहे.
 
हेही वाचा : विधानपरिषदेच्या निवडणूकांसंदर्भात तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेणार
 
यावेळी भाजपा मुंबई चिटणीस जितेंद्र राऊत, नगरसेविका हेतल गाला, नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, वांद्रे पश्चिम विधानसभा संयोजक किशोर पुनवत, एसआरए सचिव दत्तात्रय नवले, एसआरए उपमुख्य अभियंता राम मिटकर आणि शासकीय अधिकारी विवेक पवार उपस्थित होते.(SRA Camp Mumbai)