मुंबई : (Diesel Supply Management) पेट्रोल-डिझेलसंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. काही लोक शेतीसाठी डिझेलचा वापर करत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यात नीट लक्ष घालून याचे नियोजन करावे. कुणालाही साठेबाजी न करू देता आवश्यकतेनुसार डिझेल मिळावे याचा प्रयत्न सुरु आहे.
काही ठिकाणी तणावाची स्थिती तयार झाली आहे. पण ही स्थिती सर्वदूर आहे, असे नाही. एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडते ती जास्त हायलाईट होते. पण तेसुद्धा होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान मोदी यांचे मिशन आम्ही महाराष्ट्रात चालवत आहोत. आपण सध्या जगाच्या अशा टोकावर उभे आहोत ज्यात अभी नहीं तो कभी नहीं अशी स्थिती आहे. त्यामुळे २०४७ मध्ये विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत बनेल. आता आपण ६६० बिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत आहोत. पुढचे २ ते ३ वर्ष हा वृद्धी दर कायम ठेवल्यास सिंगापूर आणि युएईच्या अर्थव्यवस्थेला आपण मागे टाकू शकतो." (Diesel Supply Management)
राज्यसभेच्या जागेबाबत राष्ट्रवादी निर्णय करेल
सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या जागेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय करेल आणि आमचे त्यांना पूर्ण समर्थन असेल. त्या जागेवर फार कुणी निवडणूक लढेल असे वाटत नाही. आमच्याकडे सत्तापक्ष म्हणून २३२ मते आहेत. त्यामुळे एकदा उमेदवार ठरला की, पुढची कारवाई होईल." (Diesel Supply Management)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....