मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आढावा बैठक ऑनलाईन
21-May-2026
Total Views |
मुंबई : (Maharashtra Banking) मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आढावा बैठक बुधवार दि.२० रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली अशी माहिती आमदार प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत शक्य तिथे बैठका ऑनलाईन माध्यमातून घेण्याचे केलेले आवाहन लक्षात घेऊन ही बैठक आयोजित केली होती. बँकेच्या कामकाजाचा आढावा, विविध प्रशासकीय विषय तसेच आगामी नियोजनाबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली." अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार दरेकर यांनी दिली.(Maharashtra Banking)