हेडगेवार समाज मंदिर कार्यालयाच्या पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन संपन्न
21-May-2026
Total Views |
मुंबई : (Hedgewar Samaj Mandir) सांताक्रुझ पूर्व येथील वाकोला, चैतन्यनगर परिसरातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संचलित ‘हेडगेवार समाज मंदिर’ कार्यालयाच्या पुनर्बांधणी कामाचे अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चौहान , राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सिंह सोलंकी आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याबाबतची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या एक्स हँडलवरून गुरुवार दि.२१ रोजी दिली आहे.