'नीट' मध्ये कुणाचा हात

    21-May-2026
Total Views |
NEET Paper Leak
 
मुंबई : (CBI Investigation Into NEET) सध्या सर्वत्र 'नीट परीक्षा ' पेपर फुटीवरून राज्यभर आणि देशभर जवळपास २३ लाख मुलांचे शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले असतानाच पेपर फुटीत कोणाचा हात आहे यावर देखील जोरदार चर्चा सुरू आहेत.भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी कृपया लातूरला बदनाम करू नका असे सांगतानाच मोटेगावकर एका पक्षाचा उघडपणे प्रचार करीत होते,पक्षास रसद पुरवत होते,त्याचे सक्रिय समर्थक होते पण यात राजकारण आणू नये असे मत व्यक्त केले होते.
 
नीट परीक्षेच्या निमित्ताने आता क्लासेस माफिया ही नवीन टोळी समोर येत आहे. ज्यात विविध खाजगी क्लासच्या संघर्षातून किती मोठे अर्थकारण असते हे समोर येत आहे.फक्त याच परीक्षेचा विचार केल्यास किती लाख विद्यार्थी यासाठी कष्ट तसेच आर्थिक गुंतवणूक करत असतात हे आपण पाहतोय.नीट परीक्षा सोबतच मेडिकल आणि इंजिनियर या दोन्ही परीक्षांची तयारी करणारे पण विद्यार्थी असतात.तसेच खाजगी क्लासेसचे भाग सुद्धा वाढत आहेत.ज्यात मेस, कॅन्टीन, झेरॉक्स, पुस्तके,अभ्यासिका, हॉस्टेल यात कोटींची उलाढाल होत असते. (CBI Investigation Into NEET)
 
हेही वाचा :  नीट पेपरफुटीचा मास्टरमाईंड शिवराज मोटेगावकर, पेपर फोडण्यासाठी पॅनेलमध्ये पेरली माणसं, स्मरणशक्तीच्या आधारे प्रश्न बाहेर
 
याउलट मात्र राज्यभर लातूर पॅटर्न याला एक प्रतिष्ठा आहे.ज्यात अनेक विद्यार्थी घडले आहेत.अनेक शिक्षकांनी गेली अनेक वर्ष कष्ट करून हा पॅटर्न घडवला आहे.पण या पेपरफुटीमुळे मात्र एकूणच शिक्षण क्षेत्रास काळिमा फासणारा प्रकार पुढे आला. नीट बाबतच्या अनेक आर्थिक कहाण्या पुढे येत आहेत.
 
याबाबत सर्वच आमदारांनी, शैक्षणिक आदर्शानी एकत्र प्रयत्न करून असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जावेत.ज्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक वातावरण खराब नक्कीच होणार नाही.कारण 'नीट पेपर फुटी' प्रकरणी सीबीआय कोठडीत असलेल्या मोटेगावकर याचाच आता पेपर नीट घ्या असे आवाहन करत असल्याचा जुना व्हिडिओ समोर येत आहे.ज्यात वन नेशन वन एक्झाम चांगली घ्यावी असे म्हणणारा मोटेगावकरच व्हिडिओ आहे.आणि आताचे त्याचे कारनामे पाहता कुंपणानेच शेत खाल्ले आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही यापुढे मात्र असे भोंदूतज्ञ उभे राहू नयेत याकडे नीट पाहणे गरजेचे आहे. (CBI Investigation Into NEET)