सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूला होली क्रॉस चॅपल! अनधिकृत बांधकाम तातडीनं हटवण्याची हिंदू संघटनांची मागणी

    20-May-2026   
Total Views |

mumbai tarun bharast

मुंबई : (Siddhivinayak Chapel Controversy) मुंबईतील लाखो हिंदूंचं श्रद्धास्थान असणाऱ्या दादरच्या श्रीसिद्धिविनायक मंदिर परिसरात उभ्या राहिलेल्या एका अनधिकृत चर्चसदृश्य चॅपेलमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सिद्धिविनायक मंदिर आणि प्रभादेवी मेट्रो स्टेशनाजवळ अभ्या राहिलेल्या चॅपेलला हिंदू समाजाकडून विरोध होतो आहे. हे अनधिकृत बांधकाम तातडीनं हटवण्याची मागणी समाज माध्यमात जोर धरु लागली आहे. सिद्धिविनायक मंदिर परिसरात असं चॅपेल अनधिकृतरित्या कसे उभे राहू शकते, असा संतप्त सवाल विचारण्यात येतो आहे.(Siddhivinayak Chapel Controversy)
सिद्धिविनायक मंदिराला लागून उभ्या असलेल्या या बेकायदेशीर वास्तूचा नेमका हेतू काय, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. ख्रिश्चन धर्मप्रचार आणि धर्मांतराच्या प्रेरणेसाठी हे सुरु आहे का, असा सवाल करण्यात आले आहेत. धार्मिक स्थळांभोवती अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण किंवा परवानगीविना उभारलेल्या बांधकामांवरुन मुंबईत यापूर्वीही वाद झाले आहेत. आता या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटना आणि काही राजकीय पक्षही आक्रमक होताना दिसत आहेत.(Siddhivinayak Chapel Controversy)

"मी श्री सिद्धिविनायक मंदिरात नेहमी जात असतो. आमची गणपती बापावर आस्था आहे. बाप्पाच्या मंदिर परिसरात जर प्रलोभने दाखवून धर्मांतरणाचे प्रयत्न होत असतील, तर ते आक्षेपार्ह आहे. आमच्या आस्थेला ते ठेच पोहोचवणारे आहे. मुंबई महापालिकेने यात लक्ष घालून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी. सदर कृती हिंदुविरोधी असून मंदिर परिसरात त्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत" .• सीए. आदित्य शेष (Siddhivinayak Chapel Controversy)

"अशा प्रकारची गोष्ट अत्यंत चुकीची असून याचे कधीही समर्थन केले जाणार नाही. धर्मांतरणला आमचा विरोध आहे. तसेच अशा प्रकारच्या अवैद्य बांधकामाबाबत व अतिक्रमणाबाबत मी मुंबई महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून याबाबत लवकरच कारवाई होईल."- आचार्य पवन त्रिपाठी, कोषाध्यक्ष, श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट

मुंबई महापालिकेची काय भूमिका? (Siddhivinayak Chapel Controversy)
ही संरचना त्या परिसरात पूर्वीपासूनच अस्तित्वात होती. मेट्रो स्थानकाचे काम सुरू असल्यामुळे तिला तात्पुरते दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले होते. आता संबंधित प्राधिकरणांकडून आवश्यक परवानग्या आणि मंजुरी घेतल्यानंतर नियमानुसार तिला पुन्हा मूळ ठिकाणी स्थापित करण्यात आले आहे.(Siddhivinayak Chapel Controversy)




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक