राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बैठकीस रोहित पवारांच्या अनुपस्थितीची चर्चा

    20-May-2026
Total Views |

mumbai tarun bharast

मुंबई : (Rohit Pawar NCP Absence) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बुधवार दि.२० रोजीच्या यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबई येथील बैठकीस आमदार रोहित पवार , अमोल कोल्हे यांची अनुपस्थिती होती.काही दिवसापूर्वी खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे खासदार प्रफुल पटेल,आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची केलेली स्तुती यामुळे रोहित पवार नाराज असल्याचे समजते त्यामुळे आजच्या बैठकीस रोहित पवार यांची अनुपस्थिती सर्वत्र चर्चेची बनली.  (Rohit Pawar NCP Absence)

विलिनीकरणावरून स्थानिक पातळीवर काम करताना अडचणी येत असून याबाबत पक्षाने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी बैठकीस उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून होत असतानाच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले की,"विलीनीकरण हा विषय आमच्याकडून संपलेला आहे पुन्हा यावर चर्चा होणार नाही.तसेच आज खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत जी भूमिका मांडली ती देशहितासाठी होती त्याला पक्षाचा किनार देण्याची गरज नाही." (Rohit Pawar NCP Absence)