विधानपरिषदेच्या निवडणूकांसंदर्भात तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; घबराट तयार करून पेट्रोल-डिझेलच्या पुरवठा साखळीत व्यत्यत आणू नये

    20-May-2026   
Total Views |

mumbai tarun bharast

मुंबई : (Maharashtra Council Election Alliance)
"विधानपरिषदेच्या निवडणूकांसंदर्भात तिन्ही पक्ष एकत्रित बसून निर्णय करावा, असा आमचा प्रयत्न आहे. आम्ही वेगवेगळ्या निकषांवर चर्चा करत असून या निवडणूकांमध्ये तिन्ही पक्ष एकत्रितच लढतील असा आमचा प्रयत्न आहे," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. (Maharashtra Council Election Alliance)

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "केंद्र सरकारने वारंवार आपल्याकडे पेट्रोल-डिझेलचा साठा असून त्याचा पुरवठा योग्य होत असल्याचे सांगितले आहे. परंतू, विनाकारण घबराट तयार होते. एखाद्या पेट्रोल पंपावर किंवा एखाद्या भागात वर्षानुवर्षे महिन्याला आणि दिवसाला किती पेट्रोल लागते याआधारे पुरवठा साखळी तयार झाली असते. पण जेव्हा अचानक अफवांमुळे लोक जास्त पेट्रोल भरायला सुरुवात करतात तेव्हा त्या पुरवठा साखळीत व्यत्यय येतो. याचा अर्थ साठा कमी आहे असे नाही. अशा प्रकारच्या घबराटमुळे अशी परिस्थिती तयार होते. जागतिक परिस्थिती वाईट असतानाही आपण आपली पुरवठा साखळी चांगली ठेवली आहे. पण आपण जर घबराट तयार केली तर ही पुरवठा साखळी नीट राहू शकणार नाही. त्यामुळे सर्वांनी योग्य प्रमाणात पेट्रोल वापरावे आणि पुरवठा साखळीत व्यत्यय आणू नये. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये." (Maharashtra Council Election Alliance)


जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेवर बोलताने ते म्हणाले की, "कुठेही पोलिसांच्या पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही. सगळीकडे पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे. नागपूरमध्ये एक घटना पुढे आली ज्यात पेट्रोल-डिझेल असतानाही एका पोलिसाने बेजबाबदारपणे असे उत्तर दिले आहे. त्याच्यावर कारवाई केली आहे." (Maharashtra Council Election Alliance)

पंतप्रधानांच्या दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, :शरद पवार यांनी सांगितले ते महत्वाचे आहे. ज्यावेळी अनेक लोक पंतप्रधान मोदी परदेशात का गेले? तिकडे काय होते? अशी टीका करत होते त्यावेळी भारताने या दौऱ्यात वेगवेगळ्या देशांसोबत धोरणात्मक करार केले आहेत. यामुळे पुढच्या १५ ते २० वर्षांचे आपले भवितव्य सुरक्षित झाले आहे. म्हणूनच शरद पवार यांनी विनाकारण टीका करू नका, असे सांगितले आहे. प्रधानमंत्री परदेशात जाऊन देशाच्या हिताचे काम करत असल्याने त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही." तसेच मागच्या वेळी मी राहुल गांधींविषयी बोललो तेव्हा शरद पवार यांना फार राग आला होता. पण मी पुन्हा सांगतो की, हा रिजेक्टेड माल आहे," असेही ते म्हणाले. (Maharashtra Council Election Alliance)

मंत्रिमंडळाने घेतलेले ९२ टक्के निर्णय पूर्ण

ते पुढे म्हणाले की, "आम्ही आमच्या मंत्रिमंडळापुढे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची किती अंमलबजावणी झाली याचे प्रेझेंटेशन घेतले. प्रत्येक विभागाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात माहिती दिली. त्यात ९२ टक्के निर्णय पूर्ण कार्यान्वित झाले असून उर्वरित ८ टक्के निर्णयांपैकी काही निर्णय राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहेत. तर, काही निर्णयांवर अजून काम सुरु आहे. पण एकूणच प्रगती चांगली आहे."(Maharashtra Council Election Alliance)

महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये सीएसआर उपक्रम चालवण्याचा प्रयत्न

टेक-महाइम्पॅक्ट परिषदेबद्दल बोलताना ते म्हणाले की, "आज राज्याच्या आयटी आणि एआय विभागाच्या वतीने मंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकाराने टेक-महाइम्पॅक्ट परिषद आयोजित करण्यात आली. मोठ्या प्रमाणात टेक कंपनी आणि इतर सीएसआर भागीदारांसोबत जवळपास १५० कोटी रुपयांचे करार करण्यात आले आहेत. आपल्याकडे सर्वात जास्त सीएसआर महाराष्ट्रात येतो. पण गेली अनेक वर्षे हा सीएसआर एमएमआर आणि पीएमआर रिजनमध्ये जास्तीत जास्त खर्च होतो. महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये सीएसआर उपक्रम चालावा असा प्रयत्न आहे. तसेच शिक्षण, आरोग्य, ट्रेनिंग, कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये सीएसआर भागीदारी करून एका स्केलवर या गोष्टी नेण्याचा प्रयत्न करत आहोत. माहिती तंत्रज्ञान विभागाने ही एक नवीन सुरुवात केली असून दरवर्षी ही परिषद होणार आहे." (Maharashtra Council Election Alliance)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "संपूर्ण जग ऊर्जा क्षेत्रात अणुऊर्जेकडे जात आहे. अमेरिकेसारख्या देशात जवळपास ४९ टक्के ऊर्जा ही अणुऊर्जा आहे. सगळ्या प्रगत देशांमध्ये अणुऊर्जेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. भारतासारख्या प्रगतीशील देशातही मोठ्या प्रमाणात ऊर्जेची मागणी वाढते आहे. सौरऊर्जा, पवन ऊर्जा यामुळे २४ तास ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे भारताला अणुऊर्जेची गरज असून पहिल्यांदाच भारत सरकारने शांती कायदा तयार केला आहे. यात अणुऊर्जेच्या नागरी वापराला परवानगी दिली आहे. त्यातून आपण महाराष्ट्रात अणुऊर्जेच्या क्षेत्रात २५ हजार मेगावॅटचे ४ करार केले आहेत." (Maharashtra Council Election Alliance)





अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....