मोटेगावकर आणि कुलकर्णीचे कारनामे, लातूरमध्ये उद्योगांच्या जागेत मोटेगावकरचे क्लासेस, बीडमध्ये कुलकर्णीचं अनधिकृत बांधकाम पाडणार
20-May-2026
Total Views |
मुंबई : (Illegal Coaching Land Scam) नीट पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शिवराज मोटेगावकर याचे प्रताप आता समोर येत आहेत. लातूरमध्ये कोरेगावरकरच्या आरसीसी क्लासेससह अनेकांचे क्लासेस उद्योगांसाठींच्या जागेवर उभारण्यात आल्याचं समोर आलंय. नव्या कारखानदारांसाठी सरकारनं दिलेल्या कोट्यवधींच्या सरकारी जमिनींवर कोचिंग क्लासच्या इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. (Illegal Coaching Land Scam)
नव्या उद्योगांच्या निर्मितीसाठी सरकारनं शहराच्या मध्यवर्ती भागात २६ एकर जागा नाममात्र दरात भाडेतत्वावर उद्योग भवनाकडे दिली होती. मात्र या जागेवर औद्योगिक कारखान्यांऐवजी शिक्षणाची फॅक्टरी उभी राहिली. जिल्हा उद्योग केंद्राने याविरोधात उद्योग भवनाला २० पेक्षा जास्त नोटीसही पाठवल्या होत्या.तर सर्वसाधारण सभेतल्या नियमांप्रमाणे कामकाज सुरु असल्याचे उद्योग भवनाचे म्हणणे आहे. आता या बेकायदेशीर इमारती पाडाव्यात अशी मागणी जोर धरु लागली आहे.(Illegal Coaching Land Scam)
Delhi: CBI produced mastermind P.V. Kulkarni, a chemistry teacher, and his associate Manisha Waghmare before the Rouse Avenue Court in the NEET UG 2026 paper leak case pic.twitter.com/rEh4KO4Wvy
शिवराज मोटेगावकर याचेही क्लरासेस याच परिसरात असल्याचे सांगण्यात येते आहे. इतकेच नाही तर मोटेगावकर याचे वैद्यकीय महाविद्याल उभारण्याचे स्पन् होते, त्यासाठीही त्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. मोटेगावकर याने लातूरजवळ ८ एकर जागा खरेदी केली होती त्या ठिकाणी इमारत आणि शैक्षणिक प्रकल्पाचं बांधकाम सुरु होतं. या ठिकाणी भविष्यात परावनग्या मिळवत मेडिकल कॉलेज उभारण्याची योजना असल्याचे सांगण्यात येते आहे.(Illegal Coaching Land Scam)
#WATCH | Maharashtra | Visuals of the under-construction structure reportedly linked to the arrested accused in the NEET UG 2026 Paper leak case, Shivraj Raghunath Motegaonkar, in Latur's Khopegaon Shivar area pic.twitter.com/e7L25eVIe2
नीट पेपटफुटी प्रकरणातील आरोपी निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी बीडमध्ये बहुमजली इमारत बांधत होता.याची किंमतही कोट्यवधींची आहे. मात्र ही इमारत बांधण्याची कोणतीही परवानगी त्यानं बीड नगरपरिषदेकडून घेतली नसल्याचे आणि नियमांचं उल्लंघन झाल्याचे अटकेनंतर समोर आले आहे. शिवशक्ती बिल्डर्स आणि डेव्हलपर्सकडून या जागेत बांधकाम करण्यात येते आहे. आता या प्रकरणात कोणत्या परवानग्या घेण्यात आला का, याचा तपास करण्यात येणार असून, संबंधितांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. आवश्यकता पडल्यास अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल असे बीड नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेस फडसे यांनी हे संकेत दिले आहेत.(Illegal Coaching Land Scam)