मालवणीत बेकायदा पाणपोई उभारणाऱ्या जिहाद्यांविरोधात एफआयआर दाखल!

    20-May-2026   
Total Views |

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मालवणी परिसरातील अब्बासिया कंपाऊंड येथे एका हिंदू महिलेच्या घरासमोर अनधिकृतरित्या छबील (पाणपोई) उभारण्याचे काम सुरु होते. या बांधकामामुळे घराचे दार बंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात होता. सदर बांधकामाविरोधात पीडित महिलेच्या पतीने आवाज उठवला असता शौकत हूसेन आबीद हूसेन सय्यद (बांधकाम धारक) आणि दिलशाद खान (ठेकेदार) या जिहाद्यांनी तिला धमकावले आणि शिवीगाळ केली. मंत्री मंगलप्रभात लोढा, विश्व हिंदू परिषद आणि दै. मुंबई तरुण भारत यांनी मिळून या विषयात लक्ष घातल्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृतरित्या उभारली जाणारी छबील जमीनदोस्त करण्यात आली. आरोपी शौकत सय्यद आणि दिलशाद खान विरोधात दोन स्वतंत्र एफआयआर मालवणी पोसील ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

पहिली तक्रार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, प्रकरणाच्या चौकशीतून सदर बांधकाम हे अनाधिकृत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार मालवणी पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम १९६६ अन्वये कलम ५२ व ४३ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

दुसरी तक्रार पीडित हिंदू महिलेने केली असून, तिने आपल्या तक्रारीत दोन्ही आरोपी कशाप्रकारे दरवाजा न उघडण्याबाबत दबाव टाकत होते, याचा खुलासा केलाय. तिने म्हटलेय की, छबीलचे बांधकाम करीत असताना ते आमच्या घराच्या भिंतीला लागुन असलेला दरवाजा बंद करुन त्यांनी आमचा येण्याजाण्याचा रस्ता बंद केला. त्यामुळे आम्ही आमच्या घराला असलेले शटर ओपन करुन त्यातुन ये-जा करीत होतो. म्हणुन घरात येण्याजाण्यास त्रास होत असलेने माझे पती रमाशंकर यांनी छबील बांधण्यास विरोध केला.

पुढे हिंदू महिला म्हणाली की, दि. १९ मे रोजी दुपारच्या सुमारास पती कामावर गेल्यानंतर ती व तिची मुलं घरात असताना दिलशाद खान व शौकत सैयद हे घराच्या दरवाजास धक्का देवून घरामध्ये आले व तिला शिवीगाळ करत तिला जिवे मारण्याची धमकी देऊ लागले. यासंबंधी महिलेने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ७४, ७९, ३२९(४), ३५२, ३५१(२), ३(५) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांकडून सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. 






ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक