वांद्र्यात बेकायदा धर्मस्थळ हटवण्याचं कारण देत अतिक्रमकांची दगडफेक, मुंबई पोलिसांचा लाठीमार

    20-May-2026
Total Views |
mumbai tarun bharast

मुंबई : (Bandra Encroachment Violence Case)
मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात गरीब नगरमध्ये सुरू असलेल्या मोठ्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.पश्चिम रेल्वेकडून सुरू असलेल्या कारवाईत बेकायदा प्रार्थनास्थळा संबंधित दोन इमारतींपैकी एक इमारत हटवण्यात आल्यानंतर स्थानिकांकडून हिंसाचार झाला आहे. या परिसरात जमलेल्या शेकडो स्थानिकांनी आंदोन सुरु करत पोलमिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पोलिासंना लाठीमार करावा लागला होता.(Bandra Encroachment Violence Case)
 

नेमकं काय घडलं?

वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरातील गरीब नगर परिसरात पश्चिम रेल्वेकडून अनधिकृत झोपड्या आणि बांधकामांवर मंगळवारपासून कारवाई सुरू झाली आहे. पाच दिवस सुरु असणाऱ्या कारवाीत बुधवारी सकाळी कारवाईदरम्यान बेकायदा प्रार्थनास्थळा संबंधित एका संरचनेवर बुलडोझर चालवण्यात आला. ही बाब समजताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर स्थानिकांनी घोषणाबाजी करत कारवाई थांबवण्याची मागणी केली. त्यानंतर काही आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या, बादल्या फेकल्या. यावेळी दगडफेक केल्याचाही आरोप आहे. त्यानंतर परिस्थिती चिघळली, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठछी पोलिसांना लाठीमार करावा लागला.(Bandra Encroachment Violence Case)
गर्दी आक्रमक होत असल्याचं पाहून पोलिसांनी प्रथम आंदोलकांना हटण्याचं आवाहन केलं. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.त्यानंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.(Bandra Encroachment Violence Case)
पाच दिवसांची मोठी मोहीम

मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वेला अतिक्रमण हटवण्याची परवानगी दिल्यानंतर मंगळवारपासून ही मोहीम सुरू झाली. कारवाईच्या आधी दोन महिने स्थानिकांना याबाबत नोटीसही बजावण्यात आलेली आहे. पहिल्या दिवशी 500 झोपड्यांपैकी 18 टक्के झोपड्या हटवण्यात आल्या. अनेकांनी स्वखर्चाने सामान हटवण्यासही सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्या या कारवाईला स्थानिकांकडून जाणीवपूर्वक विरोध होत असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. प्रशासनाने ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार आणि रेल्वे हद्दीतच होत असल्याचं स्पष्ट केलं आहे.रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे हद्दीत आणि ट्रॅकजवळील सुरक्षा क्षेत्रात ही कारवाई केली जात आहे. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.(Bandra Encroachment Violence Case)