Ishank Singh Swimming Record : रांचीच्या लहानग्या थेट समुद्राला आव्हान!

नऊ तासांत २९ किमी समुद्र पार करत इशांकने रचला इतिहास

    02-May-2026   
Total Views |
Ishank Singh Swimming Record
 
मुंबई : (Ishank Singh Swimming Record) झारखंडमधील ७ वर्षांच्या एका चिमुकल्याने समुद्राच्या लाटांवर पोहत जगातील सर्वात कमी वयाचा आणि सर्वात वेगवान जलतरणपटू होण्याचा दुहेरी विक्रम प्रस्थापित केला आहे. या मुलाने श्रीलंकेतील तलाईमन्नार येथून पोहण्यास सुरुवात करून भारतातील धनुषकोडीपर्यंतचे अंतर केवळ ९ तास ५० मिनिटांत पूर्ण केले. जागतिक विक्रमासह ही असामान्य कामगिरी करणाऱ्या या मुलाचे नाव इशांक सिंह असून तो झारखंडमधील रांची येथील रहिवासी आहे.(Ishank Singh Swimming Record)
 
इशांकने ३० एप्रिल रोजी पहाटे सुमारे ४ वाजता श्रीलंकेतील तलाईमन्नार येथून पोहण्यास सुरुवात केली आणि दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी रामनाथपुरम जिल्ह्यातील धनुषकोडी येथे पोहोचला. समुद्रातील तीव्र प्रवाह आणि उंच लाटांचा सामना करत त्याने २९ किलोमीटरचे अंतर अवघ्या ९ तास ५० मिनिटांत पार केले. इशांकने ही जलतरण मोहीम टीएसयूएसए (ट्रॅव्हल साउथ यूएसए) या संस्थेचे अधिकृत निरीक्षक डॉ. एम. विजयकुमार यांच्या उपस्थितीत पूर्ण केली. आपले लक्ष्य यशस्वीरीत्या गाठत इशांकने जगातील सर्वात कमी वयाचा आणि सर्वात वेगवान जलतरणपटू होण्याचा दुहेरी विक्रम केला आहे. त्याच्या या कामगिरीची युनिव्हर्सल रेकॉर्ड्स फोरम (यूआरएफ) संस्थेने दखल घेऊन त्याला प्रमाणपत्र प्रदान केले.(Ishank Singh Swimming Record)
 
इतक्या कमी वयात जागतिक विक्रम प्रस्थापित करून इशांक अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे. या छोट्या मुलाच्या आत्मविश्वासाचे आणि कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. रांची येथील एका शाळेत दुसरी इयत्तेत शिकणारा इशांक लहानपणापासूनच जलतरण प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना इशांकने सांगितले की, थेनी येथील ओपन वॉटर स्विमिंग अकादमीमध्ये मिळालेल्या प्रशिक्षणामुळेच ही कामगिरी शक्य झाली.(Ishank Singh Swimming Record)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक