मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "या संपर्क केंद्राच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना २४ तास प्रशासनाशी थेट संपर्क साधता येणार असून, विविध शासकीय सेवा, तक्रारी आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या काळ वेगाने बदलत आहे. त्यानुसार नागरिकांच्या समस्यांचे स्वरूपही बदलत असून त्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी दिवस रात्र चोवीस तास जनसेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना त्यांच्या अडचणींसाठी वारंवार कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत यासाठी अनेक अडचणींची तक्रार ऑनलाइनही केली जाऊ शकते. या अनुषंगाने नागरिकांना मार्गदर्शन व्हावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे."(Mumbai Janseva Contact Center)
ते पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आपला महाराष्ट्र प्रगतीपथावर असून त्यांच्या मार्गदर्शनात अनेक सेवा या ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या सेवांची माहितीही या केंद्रात देण्यात येईल. महापालिकेशी संबंधित समस्या, म्हाडा, एसआरए, म्हाडा दुरुस्ती मंडळ, रेशनिंग कार्ड, वीज पुरवठा, तसेच पोलिस विभागाशी संबंधित तक्रारींचे संदर्भ तसेच विविध आवश्यक दाखले ही मिळवून देण्याचे काम या जनसेवा केंद्रात होणार आहे."(Mumbai Janseva Contact Center)