अभिनेते आर.माधवन यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
17-May-2026
Total Views |
मुंबई : (R. Madhavan Meets Devendra Fadnavis) फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडीयाचे अध्यक्ष अभिनेता आर.माधवन यांनी शनिवार दि.१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी आपल्या प्रतिक्रियेत आर. माधवन म्हणतात,"आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि सन्मानाचा क्षण होता. प्रचंड जबाबदाऱ्या पेलणाऱ्या नेत्यांमध्ये, त्यांचा शांत आणि प्रसन्न स्वभाव तसेच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ही खरोखरच एक दुर्मिळ गोष्ट आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारखे आणि अंगीकारण्यासारखे खूप काही आहे. सर, आपण दाखवलेल्या आपुलकीबद्दल आणि सौजन्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार."(R. Madhavan Meets Devendra Fadnavis)