आमदार चित्रा वाघ यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना महिलांच्या समस्यांबाबत निवेदन
16-May-2026
Total Views |
मुंबई : (POSH Act) भाजप आमदार चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी तसेच काही महत्वाच्या सुचनांसह निवेदन शुक्रवार दि.१५ रोजी दिले.
" नाशिक मधील टी सी एस सारखी मोठ्या कंपनी असेल किंवा मुंबई महानगरपालिकेत घडलेल्या धक्कादायक प्रकरणांमुळे अनेक महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नोकरी, करिअर आणि प्रतिष्ठेच्या भीतीपोटी अनेक महिला अन्याय सहन करतात पण आता ही भीती संपली पाहिजे, या ठाम भूमिकेतून सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक महिलेला सुरक्षित आणि सन्मानाचे कार्यस्थळ मिळणे हा तिचा अधिकार आहे, यासाठी पॉश कायद्याची सुधारीत सुचनांसह प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे." अशी भूमिका यावेळी आमदार चित्रा वाघ यांनी मांडली. (POSH Act)
यावेळी आमदार चित्रा वाघ यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना देखील एक निवेदन दिले ज्यात शाळांमध्ये लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार व पॉक्सो गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत तसेच काही महत्वाच्या सुचना सांगितल्या आहेत. (POSH Act)
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले उपस्थित होते. (POSH Act)