भारतीय युवकांना मंद म्हणणाऱ्यांनी आधी वास्तव पाहावं — नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला

    16-May-2026
Total Views |
Navnath Ban V/S Sanjay Raut
 
मुंबई : (Navnath Ban V/S Sanjay Raut) लेनिनचे कोट सांगणाऱ्यांनी भारतीय युवकांचे कर्तृत्वही पाहावे. युवक भरकटलेले नाहीत नैराश्याच्या राजकारणाला त्यांनी नाकारलं आहे असा टोला भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवार दि.१५ रोजी आपल्या एक्स हँडलवरून संजय राऊत यांना लगावला आहे.
 
आपल्या ट्विट मध्ये बन म्हणतात,"जनाब संजय राऊतजी,लेनिनचे कोट शोधताना तुम्ही इतके गुंग झालात की भारतीय युवक काय करत आहेत हेच विसरलात.ज्यांना तुम्ही “मंद” म्हणता तेच युवक आज स्टार्टअप उभारतायत,चंद्रावर मोहिमा पाठवतायत,देश चालवतात,सीमेवर उभे राहतात,आणि मतदानातून तुमच्यासारख्या लोकांना वास्तवही दाखवतायत.
 
खरं तर युवकांची विचार करण्याची क्षमता संपलेली नाही, फक्त “दररोज सकाळी उठून नैराश्य विकणाऱ्या राजकारणा”कडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे.आणि हो “जय श्रीराम” लिहिल्यामुळे युवक भरकटले असे म्हणत असाल, तर भारतात रामाचा जयघोष हजारो वर्षांपासून आहे. तुम्ही मात्र अद्याप भरकटलेले आहात कारण तुम्हाला अजूनही मॉस्कोच्या सावलीत भारत दिसतो."(Navnath Ban V/S Sanjay Raut)