ब्रह्मांड जंक्शन–टिकुजीनीवाडी मेट्रो स्थानक पादचारी पुलाचे काम पूर्ण;एमएमआरडीएची अभियांत्रिकी कौशल्याची छाप

Total Views |
Mumbai Metropolitan Region Development Authority
 
मुंबई : (Mumbai Metropolitan Region Development Authority) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ब्रह्मांड जंक्शन ते टिकुजीनीवाडी मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत साकारण्यात आलेला हा प्रकल्प अभियांत्रिकी उत्कृष्टतेचा नवा मानदंड ठरत आहे.
 
घोडबंदर रोडवरील मोठ्या प्रमाणातील वाहतूक आणि त्याच परिसरातील मेट्रो व्हायाडक्टमुळे या प्रकल्पाच्या उभारणीसमोर अनेक तांत्रिक आव्हाने होती. मात्र अत्यंत अचूक नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. या प्रकल्पामध्ये चार विशाल स्टील गर्डर्सची उभारणी करण्यात आली असून प्रत्येक गर्डरची लांबी ५९.६३ मीटर आणि वजन तब्बल २५२ मेट्रिक टन इतके आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सर्वाधिक वर्दळीच्या वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या घोडबंदर रोडवर सुमारे ६.१६७ मीटर उंचीवर या गर्डर्सची उभारणी करण्यात आली.
 
हेही वाचा :  Missing Link Accident: मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’वर दुहेरी अपघात; ३ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी...
 
या गुंतागुंतीच्या प्रक्रियेसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. यामध्ये मल्टी-अ‍ॅक्सल कॅरियर्ससह दोन पुलर्स, २५० मेट्रिक टन क्षमतेच्या दोन क्रेन्स, ८०० मेट्रिक टन क्षमतेची एक क्रेन आणि १५ मेट्रिक टन क्षमतेच्या चार सहाय्यक क्रेन्सचा समावेश होता. याशिवाय ६० हून अधिक अभियंते, पर्यवेक्षक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या टीमने समन्वयाने काम करत संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.(Mumbai Metropolitan Region Development Authority)
 
विशेष म्हणजे, गर्डर उभारणीचे काम अत्यंत अचूकता, सुरक्षितता आणि काटेकोर नियोजनासह पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पामुळे भविष्यात प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत सुरक्षित आणि सुलभ पादचारी सुविधा उपलब्ध होणार आहेत.(Mumbai Metropolitan Region Development Authority)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.