मुंबई : (Mankhurd Jail) राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण आणि कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगत असलेली ११ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करून नवीन कारागृह उभारण्यासाठी मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत जमिनीचा आगाऊ ताबा अधीक्षक, मुंबई मध्यवर्ती कारागृह यांना देण्यात आला. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. केवळ एका दिवसात १२०० पेक्षा अधिक झोपड्या हटवून प्रशासनाने ११ एकर जागा मोकळी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मौजे मानखुर्द, ता. कुर्ला येथील गट क्रमांक १/२ मधील ही जमीन कारागृहासाठी देण्याचे निर्देश देण्यात आले होते.(Mankhurd Jail)
"मुंबईची सुरक्षा आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी बैठक घेऊन निर्णय घेतला होता."- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री(Mankhurd Jail)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....