महाराष्ट्रात एटीएफवरील व्हॅट १८ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत कमी

-महाराष्ट्रातील लाखो हवाई प्रवाशांना थेट लाभ -हवाई भाडे नियंत्रणात ठेवण्यास मदत -केंद्रीय मंत्री राम मोहन नायडूंनी खास शैलीत मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

Total Views |
Airfare Reduction Maharashtra Impact
 
मुंबई : (Airfare Reduction Maharashtra Impact) पश्चिम आशियातील संकटामुळे भारतीय विमान वाहतूक उद्योगासमोर हवाई मार्ग बंद होणे, अनिश्चित उड्डाण संचालन तसेच एटीएफ (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल) दरवाढीची गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. अशातच आता हवाई प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, दि.१५ मे रोजी एटीएफवरील व्हॅटमध्ये 18 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
 
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने विमान कंपन्यांना विविध स्वरूपात दिलासा दिला आहे. यामध्ये देशांतर्गत नियोजित विमान कंपन्यांसाठी एटीएफ दरांवर मर्यादा, विमानतळ शुल्कात कपात, आपत्कालीन कर्ज सुविधा योजना आदी उपायांचा समावेश आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील महत्त्वाचा खर्च असलेल्या एटीएफवरील व्हॅटमध्ये कपात करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून विविध राज्य सरकारांशी सातत्याने संवाद सुरू होता. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेत एटीएफवरील व्हॅट १८ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय आजपासून लागू केला आहे.(Airfare Reduction Maharashtra Impact)
 
 
नायडू यांनी म्हटले की, "विमान वाहतूक उद्योगातील एक महत्त्वाचा खर्च म्हणजे एटीएफवरील व्हॅट, जो राज्य सरकारांकडून आकारला जातो. नागरी विमान वाहतूक मंत्रालय गेल्या काही काळापासून विशेषतः या संकटाच्या काळात राज्य सरकारांशी हा व्हॅट कमी करण्यासाठी सातत्याने चर्चा करत आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी पुढाकार घेत आजपासून एटीएफवरील व्हॅट 18 टक्क्यांवरुन 7 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय जाहीर केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो".(Airfare Reduction Maharashtra Impact)
 
महाराष्ट्रात सध्या १६ कार्यरत विमानतळ असून राज्यातील वार्षिक हवाई प्रवासी संख्या सुमारे ७.५ कोटी आहे. दररोज सुमारे दोन लाख प्रवासी हवाई प्रवास करतात. एटीएफवरील व्हॅट कपातीमुळे राज्यातील सर्व विमानतळांवरील उड्डाण संचालनास चालना मिळणार असून वाढत्या जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हवाई भाडे नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो हवाई प्रवाशांना थेट लाभ मिळणार असून विमान वाहतूक क्षेत्रालाही मोठा आधार मिळणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.(Airfare Reduction Maharashtra Impact)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.