मुंबई-गोवा महामार्गावर झालयोची एलपीजी टँकरला धडक, महिला ठार, दोन लहानगे जखमी

    15-May-2026
Total Views |
Ratnagiri Accident News
 
रत्नागिरी : (Ratnagiri Accident News) नेहमीच चर्चेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात भीषण अपघात घडलाय. भरधाव झालयोनं रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एलपीजी गँस टँकरला जोरदार धडक दिली. नातूनगर धरम परिसरात हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दोन लहानग्यांसह तिघेजणं जखमी झालेत. या अपघातानंतर बचावकार्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
 
नेमका कसा घडला अपघात
 
मुंबईहून खेडच्या दिशेनं चाललेली झायलो भरधाव वेगानं जात होती. झायलो अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या टँकरला झायलोनं जोरदार धडक दिली. अपघातात झायलो चक्काचूर झालीय. या दुर्घटनेत साबिया जसनाीक या ३३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झालाय. तर ४ वर्षांचाअब्दुल जसनाईक आणि ७ वर्षांची सेहरा जसनाईक या दोघा लहानग्यांसह इमरान जसनाईक हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे घडला याचा तपास आता पोलीस करतायेत. (Ratnagiri Accident News)
 
मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचं वाढतं प्रमाण
 
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम, खराब रस्ते, अपुरी प्रकाशव्यवस्था, ओव्हरटेकिंग, भरधाव वाहने आणि अवजड ट्रक यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याची तक्रार स्थानिकांकडून वारंवार केली जात आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पट्ट्यातील काही भाग ब्लॅक स्पॉट म्हणूनही ओळखले जातात.
 
 
फेब्रुवारी २०२६ मध्ये रायगड जिल्ह्यात नवविवाहित दाम्पत्याच्या दुचाकीला सिमेंट मिक्सर ट्रकची धडक बसली. यात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली.
 
मार्च २०२६ मध्ये महामार्गावर बहिण-भावाच्या दुचाकीचा अपघात झाला. या घटनेत बहिणीचा जागीच मृत्यू झाला, तर भाऊ गंभीर जखमी झाला.
 
मे २०२६ मध्ये रत्नागिरीजवळ भरणेनाका येथे थांबलेल्या आराम बसला भरधाव स्विफ्ट कारने धडक दिली. या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले.
 
महाराष्ट्रातील एकूण रस्ता अपघातांच्या पार्श्वभूमीवर २०२५ मध्ये राज्यात 36 हजारांहून अधिक अपघात झाले आणि १५ हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यात दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. (Ratnagiri Accident News)