मुंबई : (Psychiatrist Dr Anand Nadkarni) ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, लेखक, आयपीएच आणि मुक्तांगणचे विश्वस्त डॉ आनंद नाडकर्णी यांचे दि. १५ मे रोजी पहाटे ५ वाजता निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील परळ भागातील खासगी रुग्णालयात उपचार घेताना त्यांची प्राणज्योत मालवली.
काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. मागचा काही काळ, ते कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र, दुर्देवाने मुंबईतील परळ भागातील खासगी रुगणालयात उपचार घेताना त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा आहे. त्यांच्या पार्थीवावर ठाणे येथे अंत्यसंसकार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे आरोग्यक्षेत्रातील तज्ञांनी, त्यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
डॉ आनंद नाडकर्णी यांनी मुंबईतून वैद्यकीय पदवी पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून मानसोपचार विषयात एमडी पदव्युत्तर शिक्षण घेतले. मागच्या तीन दशकांहून अधिक काळ ते मानसोपचार क्षेत्रात सक्रिय होते. मानसिक आजार, ताणतणाव आदी विषयांवर त्यांनी विपुल लेखन तर केलेच, मात्र त्याचबरोबर जनमानसात मोठ्या प्रमाणत जागृती करण्याचं काम अव्याहतपणे त्यांनी केलं.
नाट्यलेखन, ललित लेखन आदी गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी मनोविश्वाचा, मानसिक विकारांचा, रोगांवरील उपचारांचा उलगडा केला. त्यांच्या 'गद्धेपंचविशी' आणि 'विषादयोग' या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर रंग माझा वेगळा आणि असेच आम्ही सारे ही त्यांची व्यवसायिक नाटकं सुद्धा गाजली.(Psychiatrist Dr Anand Nadkarni)
ग्रंथसंपदा
मितुले आणि रसाळ
मुक्तिपत्रे
शहाण्यांचा सायकिअॅट्रिस्ट
स्वभाव-विभाव
हेही दिवस जातील!
असेच आम्ही सारे (नाटक)
आम्ही जगतो बेफाम (नाटक)
रंग माझा वेगळा (नाटक)
जन्मरहस्य (स्किझोफ्रेनियावरील नाटक)
गेट वेल सून (नाटक, कथा संकल्पना आनंड नाडकर्णींची; नाट्यलेखन प्रशांत दळवी यांचे)
मानसोपचार क्षेत्रात गेली अनेक दशके अतुलनीय योगदान देणारे ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ, लेखक, नाटककार आणि समाजप्रबोधनकार डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (IPH) आणि मुक्तांगण डी- ॲडिक्शन सेंटरच्या माध्यमातून त्यांनी मानसिक आरोग्याबाबत समाजात जनजागृती घडवून आणली. लेखन, नाट्य, संगीत, चित्रकला आणि संवाद यांच्या माध्यमातून मानवी मनाचे विविध पैलू त्यांनी संवेदनशीलतेने समाजासमोर मांडले. पुस्तके, व्याख्याने, मुलाखती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याचा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील.
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.