परभणीचे जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांची जिल्हाधिकारी कार्यालयात सायकल वारी
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले ट्विट
15-May-2026
Total Views |
मुंबई : (Parbhani District Collector Sanjay Chavan) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत परभणीचे जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सायकलने हजेरी लावली. याबाबतचे ट्विट परभणी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शुक्रवार दि.१५ रोजी केले आहे.
आपल्या ट्विट मध्ये बोर्डीकर म्हणतात,"परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी ‘सायकल डे’ उपक्रमाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इंधन बचत व पर्यावरण संरक्षणाच्या संकल्पनेला आणि आपल्या सर्वांच्या सामूहिक जबाबदारीला त्यांनी कृतीतून बळ दिले आहे."
"शुक्रवार दि.१५ सायकलने जिल्हाधिकारी कार्यालयात येत त्यांनी प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैली यासाठी अशा उपक्रमांची समाजात मोठी गरज आहे.जिल्हाधिकारी साहेबांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!"असेही मत बोर्डीकर यांनी व्यक्त केले आहे.(Parbhani District Collector Sanjay Chavan)