एमएमआरडीएकडून मेट्रो मार्गांवरील बॅरिकेड्स हटविले; मेट्रो प्रकल्पांमधील १.१४ लाख मीटरहून रस्ते नागरिकांसाठी खुले

Total Views |
 Mumbai Metro
 
मुंबई : (Mumbai Metro) मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक अधिक सुलभ करण्यासोबतच मान्सून काळात नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आपल्या सुरू असलेल्या विविध मेट्रो व पायाभूत सुविधा प्रकल्पांअंतर्गत मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्स हटविण्याची आणि मान्सूनपूर्व तयारीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे.(Mumbai Metro)
 
याबाबत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले की," एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या मेट्रो आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये मान्सूनपूर्व तयारी आणि बॅरिकेड्स हटविण्याची प्रक्रिया महत्वपूर्ण मोहिमांपैकी एक आहे. विविध मेट्रो मार्गांवरील व्हायाडक्ट व संरचनात्मक कामे मोठ्या प्रमाणात पूर्णत्वाकडे गेल्याने, मान्सूनपूर्व काळात नागरिकांसाठी अधिकाधिक रस्ते मोकळे करण्याच्या उद्देशाने पूर्ण झालेल्या मेट्रो मार्गांखालील बॅरिकेड्स नियोजनबद्ध पद्धतीने हटविण्यात येत आहेत. तसेच सर्व कंत्राटदार, सल्लागार संस्था आणि प्रकल्प यंत्रणांना स्वतंत्र आपत्कालीन प्रतिसाद पथके, डिवॉटरिंग पंप, आपत्कालीन यंत्रसामग्री, सुरक्षा कर्मचारी आणि २४x७ तयारी यंत्रणा तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून मान्सून काळात प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत राखता येईल.” (Mumbai Metro)
 
हेही वाचा :  नालेस्वच्छतेचा वेग वाढवून ३१ मे पर्यंत कामे पूर्ण करा; महापौरांचे प्रशासनाला निर्देश; नालेस्वच्छता व रस्ते विकास कामांची पाहणी
  
तपशील
 
मेट्रो मार्ग २बी (डी. एन. नगर–मंडाळे) :१८,२७७ मीटर (८८.६४%)
मेट्रो मार्ग ४ व ४ए (वडाळा–कासारवडवली–गायमुख) :३१,७०६ मीटर (९२%)
मेट्रो मार्ग ५ (ठाणे–भिवंडी) : ११,१३४ मीटर (९८.८८%)
मेट्रो मार्ग ६ (स्वामी समर्थ नगर–विक्रोळी) :२८,९५२ मीटर (९६%)
मेट्रो मार्ग ९ (दहिसर पूर्व–मिरा भाईंदर) : १७,२७५ मीटर (९४%)
मेट्रो मार्ग १२ (कल्याण–तळोजा) : ७,१७४ मीटर
मेट्रो मार्ग ७ए (अंधेरी पूर्व–छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) :टप्प्याटप्प्याने बॅरिकेड्स हटविण्याचे काम सुरू
 
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.