मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 18 कोटींच्या चांदीच्या विटा रस्त्यावर, पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं घडजलं तरी काय?

    15-May-2026
Total Views |
 Mumbai Ahmedabad Highway Accident
 
पालघर : (Mumbai Ahmedabad Highway Accident) एकीकडे सोन्या-चांदीचे भाव गगनाला पोहचलेले असताना, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चांदीच्या विटा रस्त्यावर पडल्याची घटना घडलीय.
 
मुंबईहून सुमारे १८ कोटींच्या या विटा गुजरातला घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा अपघात झाल्यानंतर, या विटा रस्त्यावर उघड्या पडल्याचं पाहायला मिळालं. व्हॅनच्या अपघातानंतर चांदीच्या विटा दिल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर कोणताची अनुचित प्रकार घडू नये यासाठी या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला.(Mumbai Ahmedabad Highway Accident)
 
नेमकं काय घडलं?
 
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी चांदीच्या विटा वाहून नेणाऱ्या एका व्हॅनचा भीषण अपघात झाला. पालघर तालुक्यातील उड्डाणपुलावरून जात असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन पलटी झाली. या व्हॅनमधून मुंबईतील नकोडा बुलियन कंपनीकडून गुजरातमधील वापी परिसरातील मोदी सन्स लिमिटेडकडे चांदीच्या विटा पाठवण्यात येत होत्या. या व्हॅनमध्ये तब्बल 17.66 कोटी रुपयांची सुमारे 600 किलो चांदी होती. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर चांदीच्या विटा वाहनाच्या तुटलेल्या भागात आणि आजूबाजूला विखुरलेल्या अवस्थेत दिसून आल्या.(Mumbai Ahmedabad Highway Accident)
 
 
चांदीच्या विटांमुळे पोलीस बंदोबस्तात वाढ
 
अपघातग्रस्त व्हॅनमध्ये कोट्यवधी रुपयांची चांदी असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. चांदी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महामार्गाच्या त्या भागात वाहतूक काही काळ नियंत्रित करण्यात आली. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू असून वाहनाचा वेग, तांत्रिक बिघाड किंवा चालकाचा ताबा सुटणे यापैकी कोणते कारण होते, याचा शोध पोलिस घेत आहेत.(Mumbai Ahmedabad Highway Accident)