अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित
15-May-2026
Total Views |
मुंबई : (Ashok Kharat Case) अशोक खरात सोबत आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप असलेल्या उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिजित भांडेच्या निलंबनाचे आदेश दिल्यानंतर याबाबतचे पत्रक काढण्यात आले.
अशोक खरातसोबत अभिजित भांडे याचे कॉल रेकॉर्डस हाती आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. भोंदू अशोक खरात आणि उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांच्यामध्ये तब्बल शंभरहून अधिक वेळा फोन कॉल झाल्याची माहिती आहे. तसेच भोंदू खरातची पत्नी आणि मुलीच्या नावे असलेल्या संपत्तीमध्ये गुंतवणूक केल्याचाही आरोप केला जात आहे. उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे यांना ही प्रकरण चांगलेच भोवल्याचे चित्र आहे.(Ashok Kharat Case)