मालेगावातील ‘लँड जिहाद’ प्रकरण तापले; योगेश निकम यांच्या दाव्याने खळबळ;सरकारकडून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

    14-May-2026
Total Views |
Malegaon Land Jihad Case
 
मुंबई : (Malegaon Land Jihad Case) नाशिकमध्ये घडलेल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणानंतर मालेगावमधून ‘लँड जिहाद’चा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजप विधी आघाडीचे शहराध्यक्ष आणि अॅड. योगेश निकम यांनी मोठा दावा करत राज्यातील जमिनी बळकावण्याशी संबंधित सर्वात मोठे प्रकरण मालेगावमध्ये समोर आल्याचे म्हटले आहे. योगेश निकम यांचा आरोप आहे की, मालेगावमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने जमिनींवर कब्जा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि हा केवळ सामान्य वाद नसून मोठ्या जाळ्याचा भाग असू शकतो. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, जेणेकरून सत्य समोर येईल, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
योगेश निकम यांच्या म्हणण्यानुसार, काही भागांमध्ये जमिनींचे व्यवहार आणि मालकी हक्कासंदर्भात अनेक संशयास्पद हालचाली समोर आल्या आहेत. स्थानिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने हा मुद्दा सार्वजनिकपणे मांडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाकडे निष्पक्ष चौकशीची मागणी करत, कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कारवाई आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणी सुद्धा करण्यात आला आहे. जमिनींसंबंधित व्यवहारांमध्ये पारदर्शकता अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.(Malegaon Land Jihad Case)
 
हेही वाचा : ब्रिटिश राजवटीतही भारत हिंदूराष्ट्रच! : दत्तात्रेय होसबाळे
 
मालेगावमधील कथित ‘लँड जिहाद’ प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. योगेश निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा आरोप केला की, परिसरातील आदिवासी आणि वनजमिनींवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमणे करण्यात आली आहेत. अतिक्रमणानंतर त्या ठिकाणी घरे, दर्गे, मशिदी आणि कत्तलखाने उभारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तक्रार मिळताच या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत. तसेच कथितरित्या संबंधित असलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.(Malegaon Land Jihad Case)